घणसोलीत गॅस सिलिंडरचा भडका घणसोलीत गॅस सिलिंडरचा भडका
नागपूर

चंद्रपूरनंतर नागपुरात सिलिंडरचा स्फोट; तिघे गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना नागपूर जिल्ह्यातील चितारओळी परिसरातील दोन मजली इमारतीत शनिवारी पहाटेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात तीन जण गंभीर जखमी तर एकजण किरकोळ जखमी झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, परिसर हादरले.

प्राप्त माहितीनुसार, मूर्तिकारांची गल्ली म्हणून नागपुरातील चितारओळी परिसर ओळखला जातो. शुक्रवारी रात्री येथील दोन मजली इमारतीत राहणारे बिंड कुटुंबीय झांत झोपले होते. पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरातील काही घरांना हादरा बसला.

ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी बिंड कुटुंबीय शांत झोपले होते. स्फोटात गजानन बिंड (६०), पत्नी ऊर्मीला बिंड (५५), सून आरती वामन बिंड (२९) हे गंभीर झाले असून, त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर नातू संकेत रवींद्र वानखेडे हा किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहे. सिलिंडरच्या लीकेजमुळे स्फोट झाल्याचं सांगितले जात आहे.

भिंत कोसळली

स्फोटाची तीव्रता इतकी होती की आवाज ऐकून परिसर हादरले. स्फोटामुळे इमारतीची तळमजल्यावरील एका बाजूची भिंत कोसळली. तसेच भिंतीवरील लोखंडी ग्रीलही तुटून बाहेर पडल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT