Dayashankar Tiwari is the 54th Mayor of the city Nmc news 
नागपूर

नागपूर ब्रेकिंग : दयाशंकर तिवारी शहराचे ५४ वे महापौर; काँग्रेसचे रमेश पुणेकर पराभूत

राजेश प्रायकर

नागपूर : दयाशंकर तिवारी यांची मंगळवारी महापौरपदी निवड करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रमेश पुणेकर यांचा पराभव केला. ते शहराचे ५४ वे महापौर ठरले. ते प्रभाग १९ चे नेतृत्त्व करतात. महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.

महापौरपदाच्या १३ महिन्यांच्या कालावधीसाठी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडली. महापौरपदी दयाशंकर तिवारी यांची निवड निश्चित होती. परंतु, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने महापौरपदासाठी निवडणूक होत असल्याने उत्सुकता वाढली होती.

सर्व नगरसेवक मोबाईल, लॅपटॉपवरून प्रक्रियेत सहभागी झाले. एकाचवेळी सर्व नगरसेवक सामील होणार असल्याने तांत्रिक बिघाडाची शक्यता होती. त्यामुळे झोननिहाय प्रभागातील नगरसेवकांच्या मताची नोंद पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली. झोननिहाय मतदान झाल्यामुळे प्रक्रियेला चांगलाच वेळ लागला. अखेर दयाशंकर तिवारी यांना १०७ मते पडली. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे रमेश पुणेकर यांना २७ मते पडली.

जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दयाशंकर तिवारी यांना विजयी घोषित केले. काँग्रेसकडून रमेश पुणेकर व मनोज गावंडे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीपूर्वी मनोज गावंडे यांनी अर्ज मागे घेतल्याने पुणेकर विरुद्ध तिवारी अशी लढत झाली. अपेक्षेप्रमाणे तिवारी महापौरपदी निवडून आले. तांत्रिक बिघाडामुळे लिंक न मिळाल्याने काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, गार्गी चोप्रा, अपक्ष आभा पांडे, सेनेचे किशोर कुमेरिया मतादानापासून वंचित राहिले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambegaon News : कपिल काळेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

White vs Brown vs Multigrain Bread: व्हाइट, ब्राउन की मल्टीग्रेन ब्रेड? वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या!

'नटरंग' नंतर अजय-अतुलसोबत काम का नाही केलं? तुमच्यात भांडण झालं का? रवी जाधव यांनी सांगितलं खरं कारण

B.Ed व LLB सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेला ८ जानेवारीपासून सुरुवात; पाहा अर्जाची अंतिम तारीख काय?

अथर्व सुदामेला पीएमपीएलचा दणका, 50 हजारांचा दंड भरावा लागणार, बसमध्ये रिल करणं भोवलं

SCROLL FOR NEXT