dayashankar tiwari will be the next mayor of nagpur 
नागपूर

नव्या वर्षात नवे महापौर, संदीप जोशी यांना द्यावा लागणार राजीनामा

राजेश प्रायकर

नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्या पक्षाने निश्चित केलेला कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यानंतर नव्या महापौरांचा प्रस्ताव पुढील महिन्यातील सभागृहात येणार आहे. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी महापौर नियोजित केले आहे. जोशी यांचा राजीनाम्यानंतर तिवारी यांच्या नावाचा रीतसर प्रस्ताव सभागृहात येणार आहे. 

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये शहर भाजपाध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी जोशी व तिवारी यांना सव्वा सव्वा वर्ष महापौरपद देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. नंदा जिचकार यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येताच तिवारी यांनी महापौरपदावर दावा केला होता. त्यांच्यासोबतच जोशी यांचेही नाव चर्चेत होते. त्यामुळे दोघांनाही महापौरपद वाटून देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. महापौर जोशी यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यानंतर दयाशंकर तिवारी शहराचे ५४ वे महापौर म्हणून सूत्रे स्वीकारतील. मात्र, यासाठी तांत्रिक बाबीची पूर्तता करावी लागणार आहे. जोशी यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानंतर समिती विभागाकडून नव्या महापौरांच्या निवडीसाठी सभागृहाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. जोशी यांना भाजपच्या त्यावेळी उपस्थित असलेल्या १०४ नगरसेवकांनी मते दिली होती. परंतु, आता महापौर राजीनामा देत असल्याने त्यांच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून तिवारी यांची निवड होणार आहे. किंबहुना पक्षाने ही निवड आधीच करून ठेवली आहे. त्यामुळे सभागृहात केवळ तिवारी यांच्या नावाचा प्रस्ताव येईल. यात कुठेही निवडणुकीची प्रक्रिया राहणार नाही. 

महापौरांच्या राजीनाम्याची दिवसभर चर्चा -
पदवीधर निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तसेच महापौरपदाचाही कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने महापौर संदीप जोशी यांनी आज राजीनामा दिल्याची दिवसभर चर्चा रंगली होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे अनेक नागरिकांनी याबाबत खात्री करून घेतली. एवढेच नव्हे नगरसेवक, पदाधिकारीही नागरिकांच्या फोनमुळे त्रस्त झाले. परंतु, जोशी यांनी राजीनामा दिला नसल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी स्पष्ट केले. 

गेल्या वर्षी सव्वा सव्वा वर्षे महापौरपदाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसारच नवीन महापौर होतील. यासाठी सभागृहात प्रस्ताव येईल. २० डिसेंबरला सभागृह आहे. परंतु, या सभागृहात हा प्रस्ताव येणे आता शक्य नाही. त्यामुळे पुढील सभागृहात प्रस्ताव येईल. 
- संदीप जाधव, सत्तापक्ष नेते, महापालिका. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT