Collarwali Tigress sakal
नागपूर

नागपूर : ‘कॉलरवाली’ वाघिणीचा मृत्यू..

पेंचमध्ये दिला होता २९ बछड्यांना जन्म

राजेश रामपूरकर

नागपूर : वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांसाठी दुःखद बातमी आहे. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र (Madhya Pradesh's Pench Tiger Reserve) प्रकल्पाची (टी १५ )'राजकुमारी' म्‍हणजे 'कॉलरवाली' वाघिणीचा (Collarwali Tigress)शनिवारी वार्धक्यामुळे मृत्यू झाला. ती १७ वर्षाची होती. २९ बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम या 'पेंचच्या राणी'ने केला आहे. जानेवारी २०१९ मध्ये या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला होता हे विशेष.

टी १५ या वाघिणीने १७ वर्षात २९ बछड्यांना जन्म दिला आहे. १७ वर्ष जंगलात जीवन जगणारी ही वाघिण सर्वांचेच आकर्षण होते. यापूर्वी लिंक ७ आणि चुरही या वाघिणीही कान्हा प्रकल्पात तर राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील मछली ही वाघिणही अधिक काळ जगल्या. मात्र, टी १५ या वाघिणीने सर्वाधिक बछ्ड्यांना जन्म देऊन नवा विक्रम केला आहे. या वाघिणीस तिच्‍या रेडिओ कॉलरमुळे कॉलरवाली असे नाव मिळाले आहे. त्‍याचप्रमाणे सुपरमॉम, पेंचची राणी, राजकुमारी या नावांनी देखील या वाघिणीला ओळखले जाते. कॉलरवाली वाघिणीचा जन्म २००५ मध्ये झाला. २००८ मध्‍ये पहिल्यांदाच तीन बछड्यांना जन्‍म दिला होता. मात्र, वातावरणामुळे तिचे बछडे दुर्दैवाने जास्‍त काळ जगू शकले नाहीत. या बछड्‍यांचा २४ दिवसाच्‍या आतच मृत्‍यू झाला होता. कॉलरवाली वाघिणीने आतापर्यंत २९ बछड्यांना जन्‍म दिला आहे व ती बछड्यांना जन्‍म देण्‍यासाठी गुहांची निवड करीत असे. पेंच प्रकल्पात कॉलर लावलेली ही दुसरी वाघिण होती.(Nagpur News)

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया या वाघिणीने आणि उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यानातील एका वाघिणीने पाच बछड्यांना एकाच वेळी जन्म दिला होता. त्या दोन्ही वाघिणींचे पाचही बछडे अधिक काळ जगू शकले नाही. मात्र, टी १५ या वाघिणीचे दिलेले पाचही बछडे वाचले आणि जंगलात मुक्त झाले आहेत. या वाघिणीची डेव्हिड ॲटम्ब्रो यांनी ‘स्पाय इन द जंगल' ही डाक्युमेंट्री तयार केली असून ती जगप्रसिद्ध आहे. २००८ ते २०१९या कालावधीत कॉलरवाली वाघिणीने २९ बछड्यांना जन्‍म दिला. त्‍यापैकी २५ जिवंत आहेत. या वाघिणीचा विक्रम जगप्रसिद्ध आहे.

टी १५ या वाघिणीने २९ बछड्यांना जन्म दिला असला तरी अखेरपर्यंत ती बिज्जामट्टी, सातमोडी, हॅण्ड पंप आणि फायरलाईन या एकाच अधिवासात मुक्कामाला होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात तृणभक्षक असल्याने तीचा अधिवास कायम याच भागात होता. ती कालापहाड, तुरीया आणि कर्माझरी या पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना कायम दिसत असल्याने सर्वांचेच आकर्षणांचे केंद्र ठरली होती. स्थानिक गाइड आणि जिप्सी चालक तीला ‘माताराम' या टोपण नावानेही ओळखत असत. या वाघिणीचा भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ. अनिरुद्ध मुजूमदार यांनी मागोवा घेऊन सविस्तर अभ्यास केला आहे.

- विनीत अरोरा, वन्यजीव अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT