debt on widows Corona pandemic nagpur sakal
नागपूर

नागपूर : कोरोनाकाळातील विधवांवर कर्जाचा डोंगर

एकल महिला पुनर्वसन समितीच्या सर्वेक्षणातील वास्तव; सरकारकडून मदतीची अपेक्षा

चंद्रशेखर महाजन

नागपूर : कोरोना काळात पतीच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या विधवांवर कर्जबारीपणाचे गंभीर संकट उभे आहे. एकल महिला पुनर्वसन समितीने राज्यातील २३ जिल्ह्‍यात केलेल्या विधवांच्या सर्वेक्षणात हे धक्कादायक वास्तव पुढे आले असून यात एक हजार ७७८ महिलांवर कर्ज असल्याचे दिसून आले. समितीने चार हजार विधवा महिलांची पाहणी केली होती. हे प्रमाण ४४ टक्क्यांवर आहे.

त्यांच्यासमोर जगण्या-मरण्याचा गंभीर प्रश्नही आहे. कोरोनामुळे अनेकांच्या आयुष्यात अंधकार झाला तर काही उघड्यावर आले. नोकरी गेल्यामुळे नैराश्य आलेल्यांना कोरोनाने घेरले. काहीजण त्या लाटेत नेस्तनाबूत झाले.शेकडोंना जिवाला मुकावे लागले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर फार मोठा आघात झाला. हजारो महिला विधवा झाल्या असून त्यांच्या आयुष्याचा प्रश्नही तितकाच बिकट झाला. कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने विधवा महिलांचे २३ जिल्‍ह्यांत सर्वेक्षण केले. यासाठी चार हजार विधवा महिलांच्या भेटी घेण्यात आल्या. यातील माहिती मन हेलावणारी आहे.पतीच्या निधनानंतर ४४ टक्के विधवांवर बँकांचे कर्ज असल्याचे दिसून आले. एक हजार ७७८ पैकी एक हजार १२४ महिलांवर विविध बॅंकांचे कर्ज आहे. ४३१ महिलांवर सहकारी पतसंस्थांचे कर्ज आहे. ४७७ महिलांवर सावकारांचे कर्ज आहे.

कर्ज फेडण्याचा प्रश्न

कोरोनात विधवा झालेल्या महिलांसमोर कर्ज फेडण्याचा गंभीर प्रश्न आहे. पतीच्या निधनामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न कायम असताना ही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. सरकारने कोरोनामुळे निधन झालेल्या कुटुंबीयांसाठी मदत जाहीर केली आहे. मात्र, ती मदतही त्या महिलांपर्यंत पोहोचली नसल्याचे वेदनादायी चित्र आहे.

दारिद्र्यरेषेचे कार्ड नाही

कोणत्याही कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यावर केंद्र सरकारकडून २० हजार रुपये कुटुंब साहाय्य निधी मिळतो. तो फक्त यातील सात टक्के महिलांनाच मिळाला आहे. दारिद्र्यरेषेची यादीच अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने या योजनेपासून महिला वंचित राहिल्या आहेत, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

कोरोनाच्या काळात कर्ता पुरुषच गेल्याने विधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर आहे. त्यात कर्ज फेडण्याचा ताणही आहे. अशाप्रसंगी बॅंका, सहकारी पतसंस्था किंवा खासगी सावकारांनी मानवीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. सरकारने त्यांना कर्जमाफी द्यावी.

-हुकुमचंद आमधरे, सहकार व बॅंक क्षेत्रातील तज्ज्ञ

  • कर्जदार महिला - १, ७७८

  • एकूण संख्या - १, १२४

  • बॅंका -४३१

  • सहकारी पतसंस्था -४७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT