Demand for arrest of Narayan Rane who threatened Sharad Pawar
Demand for arrest of Narayan Rane who threatened Sharad Pawar Demand for arrest of Narayan Rane who threatened Sharad Pawar
नागपूर

नारायण राणेंना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही; राष्ट्रवादी आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांना गुरुवारी ‘घरी पोहोचणे कठीण होईल’ अशी धमकी दिली होती. त्यांच्या धमकीचे पडसाद शुक्रवारी (ता. २४) शहरात उमटले. शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. (Demand for arrest of Narayan Rane who threatened Sharad Pawar)

राज्यातील राजकीय परिस्थितीवरून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ‘त्यांना घरी पोहोचणे कठीण होईल’ अशी धमकी दिली होती. राणेंनी ट्विटच्या माध्यमातून केलेल्या या वक्तव्यावर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने संताप व्यक्त करीत व्हेरायटी चौकात आंदोलन केले. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर बर्डी पोलिस ठाण्यामध्ये राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक करा, अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राणे यांच्या बॅनरवरील फोटोवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना नागपुरात पाय ठेऊ देणार नाही, असा निर्धारही व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: आम्ही काम करतो, इतरांसारख खोट बोलत नाही, अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT