Devendra Fadnavis sakal
नागपूर

Devendra Fadnavis Latest News : "चहाला वेळ नसते पण वेळेला चहा असतो.." फडणविसांनी टपरीवर घेतला दोस्तांसोबत चहाचा आस्वाद!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जुन्या मित्रांसोबत मस्त वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतला.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur News : एरव्ही राजकारणात व्यस्त असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जुन्या मित्रांसोबत मस्त वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतला. यावेळी ते जुन्या मित्रांसोबत चर्चेत रमल्याचे दिसून आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठकीसाठी वनामती येथे आले होते. बैठकीनंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्याचे ठरवले. दुपारी दोनच्या सुमारास जयप्रकाशनगर येथील किशोर धर्मे या मित्राकडे जात असताना त्यांना चहाची टपरी दिसली. खामला मार्केट ते जयप्रकाशनगर मार्गावरील टपरीवर ते थांबले.

येथे त्यांनी चहा मागितला. उपमुख्यमंत्र्यांचा संपूर्ण ताफाही थांबला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी, माजी नगरसेवक गोपाल बोहरे, सुरेंद्र पांडे व इतर काही कार्यकर्ते होते. सर्वांनीच काही वेळ गप्पा करीत चहा घेतला. उपमुख्यमंत्री फडणवीस टपरीवर चहा पित असल्याचे बघून अनेकांनी गर्दी केली.

देवेंद्र फडणवीस सध्या राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहे. याशिवाय जनहितासाठी काम करताना त्यांना वेळ मिळत नाही. अशा स्थितीत कुठलाही मोठेपणा न दाखवता त्यांनी साध्या ग्राहकाप्रमाणे चहाचा आनंद लुटला. अनेक दिवसांनी टपरीवर चहा पिताना त्यांनी मित्रांसोबत चर्चेदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा दिला.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Amazon Container Accident: चालकाला डुलकी लागल्याने ॲमेझॉनचा कंटेनर महामार्गावरील खड्ड्यात पलटी; मोठे नुकसान, मोठी दुर्घटना टळली

Manoj Jarange Warning Meet: माढ्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या इशारा बैठकीसाठी जोरदार तयारी; विविध समित्यांची स्थापना, मराठा समाजात उत्सुकता

Marathi Live Updates News: वारजेतील वडापाव सेंटरसह हॉटेलचा परवाना निलंबित

Nashik Rail Protest: पुणे-नाशिक सरळ रेल्वेमार्गासाठी ९ ऑगस्टला आळेफाट्यावर चक्काजाम; पक्षनिरपेक्ष जनआंदोलनाची हाक

SCROLL FOR NEXT