Deputy Director of education department gives instructions about flag hosting  
नागपूर

यावर्षी कसा साजरा होणार स्वातंत्र्यदिन? शाळांमध्ये ध्वजारोहण करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिल्या या महत्वाच्या सूचना

मंगेश गोमासे

नागपूर:  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा परिणाम यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवावर होणार आहे. राज्यशासनाने काढलेल्या नियमावलीमुळे आता केवळ पाच व्यक्तींच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा करता येणार आहे. या नियमांचा आधार घेत विभागीय शिक्षण उपसंचालकांना शाळांना सूचना दिलेल्या आहेत.

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. मार्च महिन्यापासून जवळपास सर्वच कार्यक्रम बंद असून सणांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. याचाच फटका आता स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला बसला आहे. त्यामुळे यावर्षी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम कशा पद्धताने साजरा करायचा याबाबत राज्य सरकारने नियमावली काढली आहे. 

या नियमावलीचा आधार घेत, उपसंचाकांनी शाळांना सूचनांचे पत्र पाठविले आहे. यामध्ये सकाळी ८.३५ ते ९.३५ यादरम्यान झेंडावंदन पार पाडायचे आहे. याशिवाय एक मुख्याध्यापक, एक शिक्षक, शाळा समितीचे अध्यक्ष याच्यासह पाच व्यक्तींचा समावेश करता येणार आहे.

तसेच झेंडावंदन करताना सामाजिक अंतर पाळावे, मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नका आणि शाळा प्रतिबंधीत क्षेत्रात असल्यास स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रम घेण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी तसे अधिकृत पत्र शाळांच्या पाठविले आहे.

हा तर राष्ट्रध्वजाचा अपमान

तोंडाला तिरंगा लावणे हा राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे. असे असताना मास्क बनवून विकले जात आहेत. मास्क वापरणारे त्याची विल्हेवाटसुद्धा योग्य पद्धतीने लावत नाही. एक दिवस तिरंगा मास्‍क घालून तो फेकून दिला जातो. त्यामुळे करोनासारखा जीवघेणा आजार पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांना नागरिकांचे कर्तव्य म्हणून अशा मास्कवर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने सिद्धू कोमजवार, प्रवीण देशमुख, राजेश वाघमारे, आशिष देशमुख, दीपक पोहणेकर, कार्तिक नारनवरे, अक्षय वाकडे, विनोद शाहू आदींनी केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sikandar Shaikh: मुळशी पॅटर्नचा थरार! महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवर आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Pune News : आजारांच्या वेदनांवर आरोग्य विभागाची फुंकर; वेदनादायक आजारांवर मिळणार जवळच पूरक उपचार

SSC Board Exam: विद्यार्थ्यांच्या भवितव्याची पहिली मोठी परीक्षा; दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, उत्साहाचे वातावरण

Latest Marathi News Live Update : राज्यात दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी केली परीक्षेसाठी नोंदणी

Green Book Record: साक्षीच्या विक्रमाची ‘ऑरेंज’ अन्‌ ‘ग्रीन बुक’मध्ये नोंद; शिवजयंतीदिनी सलग १२ तास १२ मिनिटे १२ सेकंद दांडपट्टा फिरवून घडवला इतिहास!

SCROLL FOR NEXT