Despite the lockdown, private companies start booking flights 
नागपूर

लॉकडाऊन असूनही खासगी कंपन्यांकडून विमानांचे बुकिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देश 14 एप्रिलपर्यंत "लॉकडाऊन' आहे. त्यानंतरही परिस्थिती निवळेल की नाही याबाबत साशंकता असतानाच खासगी विमान कंपन्यांनी 15 एप्रिलपासूनच्या विमानांसाठी बुकिंग सुरू केले. नागपूरहून मुंबई, दिल्ली, पुण्यासाठी तिकीट उपलब्ध आहे. पण, विमानसेवा पूर्ववत करण्यासंदर्भात शासनाचे अद्याप कोणतेही दिशानिर्देश नसल्याने विमान उड्डाण भरेल की नाही, यासंदर्भातील सस्पेन्स आहे.

देशभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे "लॉकडाऊन'चा अवधी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परंतु, त्याकडे कानाडोळा करीत खासगी विमान कंपन्या व्यावसायिक संधी साधून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. इंडिगो आणि गो एअरने 15 एप्रिलपासून विमानांच्या उड्डाणाचे शेड्युल ऑनलाईनवर उपलब्ध करीत बुकिंग सुरू केले. इंडिगोच्या संकेतस्थळावर दिल्लीहून नागपूरसाठी 15 एप्रिलच्या पहाटे 5.15 आणि सकाळी 10.25 वाजता विमानाची वेळ दर्शविण्यात आली आहे.

गो एअरवेजनेही रात्री 8.10 वाजताची वेळ दर्शविली आहे. त्याच दिवशी मुंबईहून गो एअरचे सकाळी 6.15 आणि सायंकाळी 6.50 वाजता तर इंडिगोचे सकाळी 11.40 आणि रात्री 8.15चे विमान दर्शविण्यात आले आहे. पुण्याहून इंडिगोने दुपारी 1 व सायंकाळी 6 वाजता विमान सोडण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय कोलकाता, चेन्नई व बेंगळुरूसाठी अन्य शहराच्यामार्गे (व्हाया) विमान सोडण्याची तयारी केली आहे.

मुंबई, दिल्ली, पुणे सेवेची तयारी

तिकीटांचे दरही चांगलेच वाढीव दर्शविण्यात आले आहे. दिल्लीचे प्रतिव्यक्ती तिकीट 4 हजार 416 ते 6 हजार 758 रुपयांच्या घरात आहे. मुंबईचे तिकीट 5 हजार 228 ते 6 हजार 357 रुपयांच्या घरात आहे. पुण्यासाठी 8 हजार 884 रुपये मोजावे लागतील.

विमान रद्द झाल्यास परतावा नाही

विमान रद्द झाल्यास प्रवाशांना पैसे परत मिळणार नाही. तर ती रक्कम कंपनीकडे शिल्लक राहील. पुढील वर्षभराच्या काळात त्या रकमेतून प्रवाशांना तिकीट खरेदी करता येईल. तिकिटाचे शुल्क जमा राशीपेक्षा अधिक असल्यास रकमेतील फरक प्रवाशांना भरून द्यावा लागणार आहे. यामुळे प्रवाशांनी नीट विचार करूनच बुकिंग करणे आपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुरत, गुवाहाटी अन् भाजपसोबत सत्तास्थापना... शिंदे गटाच्या बंडामागे काय होतं? कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयात मांडला घटनाक्रम

Marathi News Live Updates : शिंदे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी उचललेली पावलं चुकीची - कामत

जुन्नर हादरलं! शेजारच्या तरुणानं शेतात नेलं अन् १० वर्षांच्या मुलीसोबत घाणेरडं कृत्य..| Junnar case

IND vs SL 1st Test: सामन्यात १० विकेट्स, तरी मानव सुथारला POM चा पुरस्कार नाही! कोण ठरला सर्वोत्तम खेळाडू अन् का?

Nagpur Muddy Road: दीड वर्षातच पांदण रस्त्याची ‘माती’; देवमुंढरीचा रस्ता चिखलमय; दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT