Destroy hundreds of hours in a cylinder explosion Destroy hundreds of hours in a cylinder explosion
नागपूर

Nagpur : एक, दोन नव्हे तर तब्बल ४० सिलिंडरचा स्फोट; टिनाचे पत्रे वितळले

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : शहराला लगून असलेला बेलतरोडी परिसर... येथील महाकालीनगर झोपडपट्टीसाठी सोमवार ‘काळा’वार ठरला... सकाळी दहा वाजता घराला शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागली... आग विझवत असताना सिलिंडरचा स्फोट झाला... जशी जशी आग पसरत होती तसे सिलिंडरचे स्फोट (cylinder explosion) होत होते... पाहता पाहता तब्बल ४० सिलिंडरचे स्फोट झाले... हवेत झेपावेत असे सिलिंडर उडत होते... हवेत उंच उडालेले सिलिंडर अनेकांच्या घराजवळ पडल्याने आग वाढत गेली अन् शंभर घरांची राखरांगोळी झाली... (Destroy hundreds of hours in a cylinder explosion)

महाकालीनगर हे तीनशे झोपड्यांची वस्ती... बहुतांश नागरिक मोलमजुरी करतात... निम्म्यापेक्षा जास्त नागरिक सकाळीच कामावर जातात... आजही तेच झाले... सकाळ १० वाजताच्या सुमारास सरवण यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली... परिसरातील नागरिक आग (Fire) विझविण्यासाठी धावले... दरम्यान, सिलिंडरचा पहिला स्फोट झाला... यानंतर सरवण यांच्या घराच्या बाजूच्या दोन्ही घरातही सिलिंडरचे स्फोट झाले.... काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले...

यानंतर सिलिंडरचे एकापाठोपाठ ४० स्फोट (cylinder explosion) झाले... स्फोटांमुळे जवळपास शंभरावर घरांना आगीने कवेत घेतले... धूर व सिलिंडर स्फोटाचे आवाज दूरपर्यंत गेल्याने बघ्यांनीही मोठी गर्दी केली... अग्निशमन विभागाने तासाभरात पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले... आग (Fire) एवढी उग्र होती की कार आणि दुचाकीही जळाल्या... शिवाय घरातील कपडे, गादी, अन्न, धान्य, भांडी आणि रोख रक्कम सारेच भस्मसात झाले...

एकापाठोपाठ चाळीस सिलिंडरचे स्फोट (cylinder explosion) झाल्याने वस्तीतील नागरिक मिळेल त्या दिशेने जीव वाचविण्यासाठी पळत होते... काही घरांमध्ये वृद्ध, लहान मुले होते... कुटुंबीयांनी त्यांना घरातून बाहेर काढले... अचानक धावपळ माजल्याने लहान मुलांच्या रडण्याचा मोठा आवाज येत होता... कामावर गेलेल्यांना नागरिकांनी बोलावले... घराची राखरांगोळीच दिसताच त्यांनी हंबरडा फोडला...

मैदानात सिलिंडरचा सडा

एक सिलिंडर हवेत उडून दुसऱ्या रांगेत पडले. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या रांगेतील घरांमध्येही स्फोट झाले. परिणामी नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी पळताना घरातील सिलिंडर बाहेर काढले. झोपडपट्टीच्या पुढे मोठे मैदान असल्याने अनेकांनी सिलिंडर तेथे फेकले. मैदानात अक्षरशः गॅस सिलिंडरचा सडा पडल्याचे दिसून आले. अग्निशमन विभागाचे (Fire department) आठ ते नऊ बंब, महापालिकेचे टॅंकरच्या पाण्याने मारा करीत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT