Devendra Fadanvis
Devendra Fadanvis 
नागपूर

ठाकरे सरकारने केंद्राने दिलेल्या निधीपैकी दमडीही खर्च केली नाही

सकाळवृत्तसेवा

नागपूर  : कोरोनाविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला आतापर्यंत कोट्यवधींची मदत केली आहे. अशा कठीण काळात एवढा निधी दिल्यानंतरही राज्य सरकारची ओरड सुरू आहे. राज्यातील ठाकरे सरकारने यातील एक रुपयासुद्धा लोकांसाठी खर्च केला नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विदर्भातील सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रिजद्वारे बैठक घेतली. यात त्यांनी दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावासुद्धा घेतला. केंद्र सरकारने वेळोवेळी 468 कोटी, सोळाशे कोटी तसेच दोन हजार 684 कोटी रुपयांची मदत आतापर्यंत केली आहे. एवढा निधी दिल्यानंतरही राज्य सरकारची ओरड सुरू आहे. मात्र यातील एक रुपयासुद्धा खर्च करण्यात आला नाही. अनेक शहरांमधून स्वस्त धान्याचे वाटप नियमित होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याकडेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. 

आपल्या शहरात अडकलेल्या व ज्यांना आपल्या मूळगावी जायचे आहे, त्या सर्वांना मदत करण्याचे निर्देश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले. याशिवाय त्यांच्या भोजनाची सोय करून धान्य व पीपीई कीट वाटपाच्या कामातही सहकार्य करण्याची सूचना त्यांनी केली. 

फडणवीस यांनी दिले गरजूंना मदत करण्याचे निर्देश
भाजपचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी एकूण 22 ठिकाणी, रोज सुमारे 68 हजार गरजूंना भोजन वाटप केले जात असल्याचे सांगितले. शहरात करोना पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने केंद्राकडून चमू पाठवण्याची मागणी प्रवीण दटके यांनी केली. सोशल मीडियावर चुकीची माहिती पोस्ट करून संभ्रम निर्माण करणाऱ्या तीनशे जणांच्या विरोधाक गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे दटके यांनी सांगितले. 

आडियो ब्रिजवर सुमारे 87 मिनट फडणवीस यांनी संवाद साधला. यात प्रामुख्याने महामंत्री रामदास आंबटकर, चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके, संगठन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर यांच्याशिवाय सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT