Devendra Fadnavis 
नागपूर

Devendra Fadnavis : नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपने पत्ते उघडले, 'या' उमेदवाराला देणार पाठिंबा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राज्यात पदवीधर निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. नागपुरमध्ये नागो गाणार यांना भाजपचा पाठींबा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषदेने यावेळेस नागो गाणार यांना परत उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिक्षक भारतीने राजेंद्र झाडे यांना उमेदवारी दिली आहे. (Graduate Constituency Election)

ठाकरे गटाने देखील आपला उमेदावर दिला आहे. दरम्यान भाजपचा नागो गाणार यांना पाठिंबा असल्याची महत्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

शिक्षक परिषदेने नागो गाणार यांना उमेदवारी दिली आहे. वर्षानुवर्षे ही जागा शिक्षक परिषद लढत आहे. भाजप आणि मित्रपक्ष त्यांना समर्थन देत असतात. यावेळी देखील आम्ही पूर्ण समर्थन नागो गाणार यांना दिले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

तसेच नागपूरमध्ये ठाकरे गट आपला उमेदवार मागे घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून गंगाधर नाकाडेंना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे, याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT