नागपूर

ईडीची कारवाई ही फक्त आणि फक्त न्यायालयाच्या निर्देशानुसार

नीलेश डाखोरे

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील घरी ईडीने छापा (ED raid) टाकला. शुक्रवार सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहे. तसेच राष्ट्रवादीचे अनेक नेते यावर भाष्य करीत आहे. ही कारवाई राजकीय हेतूने सुरू असल्याचे बोलत आहे. या सर्व प्रकरणावर भाष्य करताना ही कारवाई कारवाई सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार होत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of the Opposition Devendra Fadnavis) म्हणाले. (Devendra-Fadnavis-said-the-action-of-the-ED-was-as-per-the-directions-of-the-court)

ईडीचे एक पथक गुरुवारी रात्रीच नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी सकाळीच अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी सुरू केली. अजूनही ही चौकशी सुरूच आहे. मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात नाही. देशमुख यांची पत्नी आणि इतर सदस्य घरी आहेत. देशमुख यांच्या घराच्या तिन्ही बाजूने २० पेक्षा जास्त बंदूकधारी सीआरपीएफचे जवान तैनात आहेत. नागपूरसोबत मुंबईतील घरावर देखील ईडीने छापा टाकला आहे. मुंबई येथे देशमुख असल्याची माहिती आहे. ईडीच्या कारवाईने आज देशमुखांना अटक होणार अशी चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राजकीय हेतूने कारवाई सुरू असल्याचे राष्ट्रवादीकडून बोलले जात आहे. भाजपच्या म्हणण्यावर सीबीआय ईडीचा गैरवापर करीत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेले आरोप निराधार आहे, असे नागपुरात आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेली कारवाई ही न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. यात कोणतेही राजकारण नाही. संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सुपारी दिली आहे. केवळ तोंडाची वाफ तुडवायची असा प्रकार सुरू आहे, असेही माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT