dgipr 
नागपूर

बघा, माहिती व जनसंपर्क विभाग किती अपडेट आहे, म्हणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत

सकाळवृत्तसेवा

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण, असा प्रश्‍न विचारला तर उद्धव ठाकरे आणि अजित पवार, असे उत्तर मिळेल. पण, राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला विचारले म्हणजे त्यांची वेबसाईट पाहिली तर वेगळेच उत्तर मिळेल. या वेबसाईटनुसार, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटीत तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवर आहेत. लोकांना योग्य माहिती आणि सूचना देण्याचे सांगणारा माहिती व जनसंपर्क विभागच चुकीची माहिती देत आहे. 

बाहेरील व्यक्तींना राज्याची माहिती व्हावी, प्रशासनाची माहिती कळावी, या उद्देशातून प्रत्येक विभागाचे संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले. त्यानुसार प्रत्येक विभागाने आपले संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर लोकहिताची प्रशासनाच्या दृष्टिकोनातून विशेष करून अधिकाऱ्यांची माहिती अपडेट असणे आवश्‍यक आहे. तशा सूचना शासनाच्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कनिष्ठ अधिकाऱ्यांना "ऑनलाइन आणि अपडेट' राहण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यालयच "आउटडेटेड' आहे. राज्यात मागील वर्षी नाव्हेंबर महिन्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.

पाटील महसूल तर मुनगंटीवार वित्त मंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. प्रथम सहा सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राज्यमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, खातेवाटपही झाले. आतापर्यंत तीन अधिवेशने झाली. सरकारचा कारभार पुढे गेला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मात्र तिथेच असल्याचे दिसते. महासंचालनालच्या संकेतस्थळावर आजही भाजप-सेनेचे सरकार असून मंत्रिमंडळही तेच आहे. महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल, असा दावा अनेकांकडून करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयालाही असेच वाटत असावे, असेच दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Prashant Raut Memorial: तुझ्यामुळे ‘सरणा’साठी जागा मिळाली, स्मारकासाठी आम्ही अपयशी; दोन दशकापासून ‘शहीद प्रशांत राऊत’ स्मारकासाठी उदासीनता!

SCROLL FOR NEXT