healthy diet.
healthy diet. 
नागपूर

पावसाळ्यात काय खावे; काय टाळावे? जाणून घ्या सुदृढ आरोग्याचा मंत्र

मनिषा मोहोड

नागपूर : पावसाळ्यात नेहमीच बळावणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी बीट, गाजर खावे. काकडी, तळलेले पदार्थ टाळावे. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी दररोज एक लिंबू आहारात असायला हवे, असा सल्ला आहारतज्ञांनी दिला आहे.

पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात. बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात. सध्या कोरोनाची भीती पसरली असून, या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात बळावणाऱ्या आजारांपासून दूर राहणे अधिक गरजेचे झाले आहे. यासाठी संतुलित, हलक्या आहाराला प्राधान्य द्यावे. पावसाळ्यातील विविध आजारांविषयी नागरिकांना माहिती असते. मात्र, पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा, याची पुरेशी माहिती घेतली जात नाही.

चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे पोटदुखी, गॅस, अपचनासोबत पोटाच्या तक्रारी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे खूप खावेसे वाटले तरी अन्नाचे पचन मात्र चांगले होत नाही. या ऋतूत पचनास अतिशय हलका असलेला आहार घ्यायला हवा. काहीवेळा खूप खाल्ल्याने पोटाच्या व्याधी निर्माण होतात. त्यामुळे आहाराकडे दुर्लक्ष करू नये.

पचनासाठी हलका आणि सकस आहार घ्या
पचनास हलका आहार घ्या, तळलेले पदार्थ खूप खाऊ नये.
मांस, अतिउष्ण पदार्थांचा अतिरेक टाळा, पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नये.
सुंठ, मिरी, हिंग, लसूण, जिरे, बडीशेप यांचा समावेश करावा.
ताप वा अन्य आजारांत मूग डाळीचे वरण, भाताची पेज, मऊ फुलके खा.
धान्याच्या लाह्या, मुगाच्या डाळीचे कढणही पोषक आहे.
फळ भाज्या स्वच्छ करून खा, आहारात तूपाचा समावेश आवर्जून करावा.

पोळी नको भाकरी खा
पावसाळ्यात दोन्ही वेळेचा आहार लवकर घेतला पाहिजे. जेवणात रोज एक लिंबू खाल्यास अनेक आजार दूर राहतात. आहारात फळभाज्यांचा वापर करावा. तसेच पोळीऐवजी भाकरी खाणे अधिक फायदेशीर ठरेल.

आजारी व्यक्तींनी असा घ्या आहार
पचनास हलके असे सूप, मऊ केलेली भाताची पेज घ्यावी, सफरचंद शक्‍यतो टाळावे, नारळपाणी पिऊ नये, बीट किंवा गाजर खावे, काकडी खाऊ नये, तळलेले पदार्थ टाळावेत, आजारातून उठल्यावर त्वरित जड किंवा चमचमीत पदार्थ खाऊ नये. या पदार्थांमुळे पुन्हा आजार बळावतो, डॉक्टरांना औषधानुरूप कोणता आहार घ्यायचा हे जरूर विचारणे गरजेचे आहे.
कविता गुप्ता,आहारतज्ज्ञ, नागपूर.  

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT