Diet's superintendent, why are the employees in the sanctity of the movement? 
नागपूर

‘डायट'चे अधिव्याख्याता, कर्मचारी का आहेत आंदोलनाच्या पावित्र्यात?

मंगेश गोमासे

नागपूर  ः शिक्षकाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्यातील ३५ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील ८७५ अधिव्याख्याता व कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या ४ महिन्यापासून झालेला नाही. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील ८७५ अधिव्याख्याता व कर्मचारी आता आंदोलनाच्या तयारीत आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी विविध विषयांचे प्रशिक्षण दिल्या जाते. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण यासारख्या संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. यांपैकी शिक्षकांचे नियमित प्रशिक्षण आणि शिक्षणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांकडे असते. या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रशिक्षण देण्यात येते. राज्यात जिल्हानिहाय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येक संस्थेत जवळपास २५ पेक्षा अधिक शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. या अधिव्याख्याता व कर्मचाऱ्यांचे पगार केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून होत असते.

मात्र, कोरोनाच्या काळात गेल्या चार महिन्यापासून केंद्र सरकारकडून अनुदान आलेले नाही. यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत कार्यरत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील ८७५ अधिव्याख्याता व कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. याचा फटका जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमधील ८७५ अधिव्याख्याता व कर्मचाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांना बसतो आहे.अधिव्याख्याता व कर्मचाऱ्यांकडून याबाबत विचारणा केली असता, उणे पगार काढण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात येते. परंतु हे कारण प्रत्येक महिन्यात एकच कारण सांगण्यात येत असल्याने आता अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनीही लवकरच पगार होईल असे स्पष्ट केले होते, मात्र, त्यानंरही अद्याप पगार झालेले नाहीत. यामुळे अधिव्याख्याता व कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT