file photo
file photo 
नागपूर

नागपूर महापालिकेचे दिव्याखाली अंधार; न्यायालयाने दिले हे आदेश... 

योगेश बरवड

नागपूर : दिव्याखाली अंधार, ही म्हण संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या नागपूर महापालिकेसंदर्भात खरी ठरली आहे. महापालिकेच्या सिव्हिल लाइन येथील मुख्यालय परिसरातच अस्वच्छ नाला, अतिक्रमण आणि डुकरांचा हैदोस सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या बाबीची गंभीर दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. नागरिकांना घाणीच्या साम्राज्यापासून मुक्तता देण्यासाठी दोन आठवड्यांत योग्य कारवाई करण्यासह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिकेला दिले. 

स्वच्छ शहर, स्मार्ट सिटी यांसारख्या घोषणा बुलंद करणाऱ्या महापालिकेला मुख्यालय परिसराच्या स्वच्छतेचाच विसर पडला. घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर आज न्यायमूर्ती रवी देशपांडे व न्या. अनिल किलोर यांच्या समक्ष सुनावणी झाली. 

या प्रकरणात ऍड. निखिल पाध्ये यांची न्यायालयीन मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनपा मुख्यालयाजवळील सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसजवळच्या नाल्यामध्ये घाण, दुर्गंधीयुक्त पाणी व कचरा साचला आहे. मरीयमनगर झोपडपट्टीतून डुकरेही येतात. त्यांचा दिवसभर वावर असतो. मनपा अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. दुर्गंधीमुळे सायंकाळी, रात्री घराबाहेर बसण्याचा आनंद घेता येत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात ऍड. सुधीर पुराणिक यांनी मनपाची बाजू मांडली. समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची तयारी मनपाच्या वतीने त्यांनी दर्शविली. 

(संपादन : मेघराज मेश्राम) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT