नागपूर

नागपूर : शहरात ईडीच्या धाडीची दिवसभर चर्चा

योगेश बरवड

नागपूर : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात ईडीच्या पथकाने छापा टाकल्याची चर्चा सोमवारी वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली. ग्रामीण आणि शहर आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अशी कुठलीही कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट केले.

अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या नागपुरातील अधिकाऱ्यावर धाड टाकल्याची चर्चा नागपुरात पसरली. उत्तर नागपुरातील ग्रामीण आरटीओ कार्यालयात प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी धडकले. परंतु, कुठलीही कारवाई झाली नसल्याचे निष्पन्न झाले. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे बघून अधिकारी वर्गात चांगलीच धडकी भरील. अद्याप बाहेरचे कुणीही चौकशीसाठी आले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे पडले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यांचा मोबाईल सतत संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने शंका बळावली. एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ते एका प्रकरणात चौकशी अधिकारी असल्याने सुनावणीसाठी गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांचे घर शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुठेही थांगपत्ता लागला नाही. शहर आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांची नियमित बैठक सुरू होती.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता चौकशीसाठी कुणीही आले नसून सर्व सुरळीत असल्याचे सांगितले. दोन्ही कार्यालयांमध्ये नियमित कामकाज सुरू होते. एकाच वेळी माध्यमांचे अनेक कॅमेरे दिसल्याने अधिकाऱ्यांमध्ये धडकी भरलेली जाणवली, त्याच वेळी कामांच्या निमित्ताने आलेल्यांमध्ये वेगळी कुजबुज सुरू होती. सरते शेवटी अधिकारी नागपुरचा असला तरी घर पुण्यातील असल्याची चर्चा सुरू आली, त्यालाही अधिकृत दुजोरा मात्र मिळू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT