Distribution of free hens to the citizens in Nagpur
Distribution of free hens to the citizens in Nagpur 
नागपूर

'तो' आला अन्‌ ट्रकभर कोंबड्या वाटून निघून गेला, मग सुरू झाले टेन्शन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जयताळा परिसरातील मोलमजुरी करणाऱ्यांचा अन्‌ हातावर पोट भरणाऱ्या एकात्मतानगरात बुधवारी सायंकाळी एक ट्रक कोंबड्या सोडून चालक निघून गेल्याने अनेकांचे टेन्शन वाढले आहे. कोंबड्या वाटप करणारा कोण?, कशासाठी सोडल्या? असे अनेक प्रश्‍न यामुळे निर्माण झाले आहे. अनेकांनी स्वःखुशीने त्या घरी नेल्या असल्या तरी वेगवेगळ्या चर्चेने सारेच धास्तावले आहेत. 

कोरोना आला तेव्हा मांसाहरामुळे वाढत असल्याची अफवा होती. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले. नंतर राज्य सरकारने याविषयी जागृती केली. चिकन व मटणमुळे कोरोना होत नाही, उलट प्रोटिन मिळते असे सांगण्याचा प्रचार केला, जाहिरातीसुद्धा केल्या. त्यामुळे कोंबड्यांबाबतची भीती पळाली. आता चिकन आणि मटणाचे भाव एकदम वाढले आहे. पाचशे रुपये किलो मटणाचा भाव आठशे रुपयांवर गेला आहे. चिकन, मटणाला चांगली मागणी असताना एकात्मतानगरात ट्रकभर कोंबड्या सोडण्यात आल्याने गूढ वाढले आहे. 

अवघ्या काही मिनिटात ट्रक रिकामा

मोफत कोंबड्या वाटल्या जात असल्याची बातमी एकात्मतानगरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे लोकांनी एकच धाव घेतली. कोंबड्या घेण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली होती. अवघ्या काही मिनिटात ट्रक रिकामा झाला. कोणाला काही कळायच्या आतच चालकाने ट्रक घेऊन पळ काढला. आपण कोंबड्यांचा ठोक विक्रता असून, धंदा बसल्याने फुकट वाटप करीत असल्याने त्याने एका नागरिकाला सांगितले.

कोंबडी खायची की नाही?

कुणीतही फुकटात कोंबडी वाटत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी कोंबड्या घेण्यासाठी तौबा गर्दी केली. आपण कोंबड्यांचा ठोक व्रिकेता आहे. मात्र, लॉकडाउनमुळे धंदा बुडाला आहे. ग्राहकच येत नसल्याचे कोंबड्यांचे काय करायचे याच विचारातून फुकट वाटप करीत असल्याचे सांगितले. यामुळे फुकटात कोंबड्या घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली. काही वेळातच तो तिथून निधून गेला. ट्रक निघून गेल्यानंतर मात्र याविषयी शंकाकुशंका निर्माण झाल्या. कोंबडी खायची की नाही, कोरोना तर होणार नाही ना? अशी भीती अनेकांना सतावत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : ‘पीओके’ भारताचेच, आम्ही ते घेऊ ;अमित शहा

आजचे राशिभविष्य - 17 मे 2024

Latest Marathi News Live Update : महायुतीची शिवाजी पार्कवर तर, इंडिया आघाडीची बीकेसी मैदानावर आज सांगता सभा

पुण्याचा चालता-बोलता इतिहास

Loksabha Election : पहिल्या चार टप्प्यांत ६६.९५ टक्के मतदान ; अधिकाधिक मतदानाचे आयोगाचे आवाहन

SCROLL FOR NEXT