file 
नागपूर

मास्क घालायला सांगणाऱ्या डॉक्टरचेच फोडले थोबाड, कोण होते ‘ते’?

संदीप भुयार

कळमेश्वर (जि.नागपूर):  सध्या कोरोनाचे दिवस आहे़त. कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी योग्य ते बंधन पाळणे आवश्यक आहे़. यात सामाजिक अंतर व मास्कचा वापर महत्वाचा आहे.  मात्र, काही नागरिक मास्क व सोशल डिस्टिंगचा वापर करीत नसल्याचे सध्या चित्र आहे़. एखाद व्यक्तीने अशा मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस ते घालण्यास सांगितल्यास वादही होत आहे. असाच काही प्रकार कळमेश्वर शहरात घडला़.  येथील एका खासगी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने रुग्णासोबत आलेल्यांना मास्क घालण्यास सांगितल्याने वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला. रुग्णासोबत आलेल्या व्यक्तींनी डॉक्टरला जबर मारहाण केली़. घटनेनंतर या मारहाण झालेल्या डॉक्टरने मारहाण करणाऱ्याविरोधात कळमेश्वर पोलिसात तक्रार दिली़.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
मारहाणीची घटना डॉक्टरच्या चेंबरमध्ये लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली़. सध्या हा मारहाणीचा व्हिडिओ शहरात सर्वत्र व्हायरल झाला आहे़. यात आधी एक पुरुष व महिला आपल्या छोट्या मुलीला घेऊन आल्याचे दिसते. त्यानंतर महिलेसोबत आलेली व्यक्ती व डॉक्टरमध्ये वाद झाला व त्यानंतर हा वाद विकोपास जावून अखेरीस आणखी दोन व्यक्ती तेथे येवून डॉक्टरला मारहाण करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

थोडे महत्वाचेः योग्य आहार, सकारात्मक विचार कोरोनाला नक्की संपवतील, जाणून घ्या काय सांगतात राष्ट्रसंत...

डॉक्टरकडून तक्रार मागे
मारहाण झाल्यानंतर डॉक्टरने मारहाण करणाऱ्यांची कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर केली होती़.  मात्र, दुसऱ्या दिवशी नोटरी करून ती एफआयआर मागे घेतली़. डॉक्टरने मारहाण झाल्यानंतर एफआयआर मागे का घेतली़, हा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे़. कोरोनाच्या काळात रुग्णांची सेवा करताना डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा कळमेश्वर डॉक्टरर्स असोशिएशनच्यावतीने निषेध करण्यात आला़.  रुग्ण सेवा करताना डॉक्टरांना संरक्षण मिळावे, भयमुक्त काम करता यावे, समोर अशी घटना घडू नये या मागणीसाठी असोसिएशनच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़. डॉक्टरांना संरक्षण न मिळाल्यास दवाखाने बंद मोहिम राबविण्या येईल व त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा असोसिएशनच्यावीने देण्यात आला़. निवेदन देणाऱ्यांमध्ये डॉ.पोतदार, डॉ. आशीष पांडे, डॉ.पल्लवी पांडे, डॉ़.जयंत देशमुख, डॉ़. शिल्पा देशमुख, डॉ़.मनीष सोनुले, डॉ.मुकेश साखरे यांचा समावेश होता़

तक्रार घेतली मागे
मारहाण झालेल्या डॉक्टरने आधी तक्रार दिली होती़  मात्र, त्यांनी त्यांनी नोटरी करून ती तक्रार मागे घेतली आहे़
- मारुती मुळुक
  पोलिस निरीक्षक,
  पोलिस ठाणे, कळमेश्वर

संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT