file 
नागपूर

डॉक्टर तुम्हीसुद्धा? व्यापाऱ्यास लावला ७२ हजारांनी चुना, कसा काय बुवा?

सतिश डहाट

कामठी (जि.नागपूर): ‘त्याचे’ नाव डॉ.आशुतोष अशोक महाजन. पेशा डॉक्टरचा. पण भल्याभल्यांचा विश्‍वास बसणार नाही. डॉक्टरी पेशाला न शोभणार असे कृत्य त्याने केले. डॉक्टर म्हणजे सर्वसामान्यांसाठी साक्षात देवदूतच! त्याने  हे चौर्यकर्म केल्यामुळे सगळीकडे त्याच्या नावाची ‘छिथू’होत आहे. आता हे डॉक्टर महोदय चक्क तुरूंगाची हवा खात आहेत. .  

असे केले चौर्यकर्म
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष रामरतन भारूका यांच्या मालकीचे सोनार ओळी कामठी येथे अभिषेक ज्वेलर्स व नावेल्टी नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. आरोपी डॉ.आशुतोष अशोक महाजन (३५, रचना अपार्टमेंट गरुड चौक,कामठी) याने ३१ डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास दुकानात येवून सायंकाळी साक्षगंध कार्यक्रम असल्याचे सांगून त्यांच्या दुकानातून  २२ हजार ५१५ रुपये किंमतीची सोन्याची चैन घेतली. बँकेत पैसे नसतानासुद्धा एचडीएफसी बॅंकेचा कामठी शाखेचा त्याने धनादेश दिला.  डॉ.आशुतोष महाजन यांच्या बँक खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश वटला नाही. तसेच त्यांचा लहान भाऊ निरंजन भारुका हे हजर असताना आरोपी आशुतोष हा तिथेसुद्धा जाऊन त्यांच्या दुकानातून ४९ हजार २९५ रुपये किंमतीचा सोन्याची चेन घेऊन त्यांनासुद्धा बॅंकेची एनईएफटी केल्याची स्लीप देऊन फिर्यादी संतोष भरुका व त्यांच्या भावाची ७१ हजार ८१० रुपयांची फसवणूक केली होती.

अधिक वाचाः असं काय झालं! अचानक कामठीच्या नागरिकांची वाढली डोकेदुखी, मळमळ

डॉक्टर नव्हे सराईत गुन्हेगार
संतोष भारुका यांनी अनेकदा आरोपी  डॉ.आशुतोष महाजन बरोबर मोबाईलवर संपर्क केला. परंतू संपर्क झाला नाही. त्यामुळे भारुका यांना आपण फसल्या गेल्याची खात्री होताच संतोष भारुका यांनी आरोपी विरोधात जुनी कामठी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी जुनी कामठी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करून तपास केला. सराईत गुन्हेगार असलेल्या या भामट्याने नागपूर शहरात विविध ठिकाणी अनेकांना फसविल्याने तहसील पोलिसांनी त्याला अटक केली होती. याची माहिती मिळताच कामठी पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहातून आशुतोष अशोक महाजन (२९) याला १७ ऑगस्ट रोजी अटक करून पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आला. आरोपीकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने मंगळवारी कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपायुक्त निलोत्पल, सहायक पोलिस आयुक्त भालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरिक्षक निलेश पुरभे, पो.हवा.किशोर माळोकर, आश्र्वेन साखरकर यांनी केली.


संपादन  : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT