Don Santosh Ambekar arrested again 
नागपूर

डॉन का छुटना अब नामुमकिन है; संतोष आंबेकरला पुन्हा अटक

अनिल कांबळे

नागपूर : शहरातील कुख्यात डॉन संतोष आंबेकर व त्याच्या भाच्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यानर बनावट दस्ताऐवजाच्या आधारे शेती बळकावण्याचा आरोप आहे. शुक्रवारी कामठीतील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदार यांना ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कामठी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वडोदा येथील शेती सव्र्हे क्र ४५४/०१ क्षेत्र १.१६ हेक्टर या शेतीचे बनावट दस्ताऐवज तयार केले. उपनिबंधक कार्यालयात मूळ जमीन मालकाच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्ती उभा करून शेतजमिनीचे खरेदी पत्र तयार केले व शेती बळकावली. यामुळे मूळ शेतमालकाची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वेगवेगळ्या गुन्ह्यात गुन्हे शाखा पोलिसांनी आंबेकर व इतरांना यापूर्वीच अटक केली होती. तो सध्या कारागृहात आहे. त्याला व केदारला शुक्रवारी गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले व कामठी न्यायदंडाधिकार्यांसमक्ष हजर केले. त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

डॉनची सुटका नाही

गुन्हे शाखेने डॉन संतोष आंबेकरला सहा महिन्यांपूर्वी अटक केली. त्याच्यावर एका डॉक्टर तरुणीसह दोघींवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच दोन सराफा व्यापाऱ्यांसह गुजरातच्या दोन व्यावसायिकांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. ड्रग्स विक्रीपासून ते भूखंड बळकावण्यापर्यंत अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे आंबेकरवर दाखल आहेत. त्यामुळे आता डॉन आंबेकरची सुटका होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT