Indurikar Maharaj esakal
नागपूर

Indurikar Maharaj : 'तीनं' हृदय तोडलं म्हणून प्रेयसीसाठी जीव देऊ नका; असं का म्हणाले इंदुरीकर महाराज?

'दहा मिनिटांत आजीचा माजी होतो, हे कळतही नाही. त्यामुळं ताकद, पैसा आणि सत्तेचा योग्य वापर करा.'

सकाळ डिजिटल टीम

'दहा मिनिटांत आजीचा माजी होतो, हे कळतही नाही. त्यामुळं ताकद, पैसा आणि सत्तेचा योग्य वापर करा.'

नागपूर : तीनं माझं हृदय तोडलं म्हणून आयुष्य संपविणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. अशांचा आपल्या खास शैलीत इंदुरीकर महाराजांनी चांगलाच समाचार घेत आपला जीव मोलाचा असल्याचं सांगितलं. देश, राष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं ते खरं प्रेम आहे, असंही इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) म्हणाले.

श्री साई पालखी परिवार विदर्भ आणि साई भक्त साई सेवक परिवारच्या वतीनं 'नाचू कीर्तनाचे रंगी' हा इंदोरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाल येथील चिटणवीस पार्क इथं झालेल्या या कीर्तन सोहळ्याला मोठ्या संख्येनं नागपूरकर (Nagpur) उपस्थित होते. श्री सदगुरू साई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 9 मार्च 2023 मध्ये नागपूर ते शिर्डी पायी पालखी पदयात्रा काढण्यात येणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.

इंदुरीकर महाराज म्हणाले, आपण सगळे एकाच देवाची लेकरं आहोत, सर्वांचं रक्त लाल आहे, पेशी, मेंदू प्रत्येकाला दिला आहे. मनुष्याला तो देव आहे याचं ज्ञान नाही. देव पाहायचा नाही तर देव बनायचं आहे. ज्ञान आलं तर देव बनाल असं जीवनतत्त्वज्ञान सांगत असताना इंदुरीकर महाराजांनी महाराष्ट्रात खरं बोलणाऱ्यांचं काय हाल होतात याचं वास्तव मांडलं.

महाराष्ट्रात खरं कोणी बोलायचं नाही, जो बोलेल त्याचा गेम होतो. असा संदेश आपल्या खास विनोदी शैलीनं दिला. आजच्या जीवनपद्धतीवर भाष्य करत त्यांनी आपल्या कीर्तनातून सर्वांना हसविलं. पैसा, सत्ता, संपत्ती आपल्या कामी येत नाही. दहा मिनिटांत आजीचा माजी होतो हे कळतही नाही. त्यामुळं ताकद, पैसा आणि सत्तेचा योग्य वापर करा. चांगलं वागणं कधीच वाया जात नाही. झाडांना पाणी द्या, शक्य तेवढ्या लोकांना मदत करा, असा सल्लाही इंदुरीकर महाराजांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Historical Discovery: शेकडो वर्षांपूर्वीचा पुरावा हाती! राजापूरच्या साखरमध्ये तलाव दुरुस्तीचा शिलालेख उघड; १८८६ची नोंद सापडली

E2EE Feature : आता Gmail मध्ये आलं व्हॉट्सॲपसारखं फीचर; एका क्लिकवर होणार सगळं काम, पाहा कसं वापरायचं?

Cotton Rate Increase : कापसाच्या दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्या; साडेआठ हजारांवर भाव गेल्याने कपाशीचा पेरा वाढणार

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT