नागपूर - पुण्यातील यशदा येथील डॉ. आंबेडकर कॉम्पिटिशन एक्झामिनेशन सेंटर (एसीईसी) प्रमाणे आणि बार्टी येरवडा संकुलात या वर्षीपासून निवासी प्रशिक्षण केंद्र सुरु होत आहेत. मात्र अनेक वर्षापासून विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्राची मागणी असूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. निवासी प्रशिक्षण प्रस्तावाला सामाजिक न्याय विभागानेच आता हरताळ फासला आहे.
विदर्भातील विद्यार्थ्यांना नागरी सेवा (युपीएससी)आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळविता यावे याकरीता नागपूर विद्यापीठातील महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसर येथे निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) २०१६ ला पाठविला गेला विद्यापीठाने जागा देऊ केली होती.
२०१६ ला बार्टीने अनुदान देण्यास हिरवी झेंडी दिली. त्यामुळे बार्टीने निवासी प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव नकाशासह प्रस्ताव विद्यापीठाकडून मागविला होता. विद्यापीठानेही ताबडतोब बार्टीला निवासी प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव पाठविला. निवासी प्रशिक्षण केंद्रात एकाच छताखाली तळमजल्यासह दोन माळ्यांची इमारत तयार करण्यात येणार होती.
तळमजल्यावर प्रशिक्षण वर्ग, सर्व कार्यालय, विद्यार्थी वर्गांसाठी अभ्यासिका, ऑडिटोरियम लॉबी, व्याख्यातांसाठी अतिथीगृहाचा समावेश होता. पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर २०० मुलां-मुलींना राहण्याची सोय, व्यायामशाळा, भोजनकक्ष राहणार होते. ४२ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव होता. एकूण जवळपास ४००० चौरस मीटरवर बांधकाम करण्यात येणार होते, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
'बार्टी 'कडे एवढा मोठा नसल्याने बार्टी ने हा प्रस्ताव पुढे सामाजिक न्याय विभागाकडे सादर केला. विद्यापीठातील निवासी प्रशिक्षण केंद्र तयार करण्यासाठी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि विद्यापीठाचे अधिकारी यांची यासंदर्भात बैठक झाली. बैठकीत सामाजिक न्याय विभागानेही होकार दिला. २० कोटींपर्यंतची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेव्हापासून हा प्रस्ताव धुळखात आहे.
डॉ. आंबेडकर कन्वेशन सेंटर तयार
विद्यापीठात हा निवासी प्रशिक्षण राबवायचा नसेल तर नागपुरात तयार होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय कन्वेशन सेंटर येथे बार्टी आणि समता प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विदर्भातील विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससीच्या निवासी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करवून देण्यात यावी. याशिवाय इतरही स्पर्धा परीक्षांचे वर्ग येथे घेता येतील.
- आशिष फुलझेले, मानव अधिकार संरक्षण मंच, नागपूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.