jail jail
नागपूर

ड्रग्ज तस्करांवर पोलिसांचे छापे; ६६ जणांना अटक

अनिल कांबळे

नागपूर : काही दिवसांपासून ड्रग्ज तस्कर आणि गांजा तस्करांची शहरात धूम होती. त्यामुळे युवा पिढी अंमली पदार्थांच्या अमलाखाली आली होती. पब, बार, पानठेले आणि नाईट पार्ट्यांमध्ये बिनधास्त ड्रग्सची विक्री होत होती. ड्रग्ज तस्करीबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच पोलिस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली. एकाच वेळी शहरात ड्रग्ज आणि गांजा तस्करावर छापे घालण्यात आले. ११ जणांना ताब्यात घेण्यात आले तर काहींकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त अस्वती दोरजे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे नवनियुक्त पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पाच टीमसह सर्वच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी शहरात धाडी टाकल्या. पोलिसांनी एकूण ५१ गुन्हे दाखल केले. यातील पाच गुन्हे अमली पदार्थ विक्रीचे आहेत.

पोलिसांनी तस्करांसह ६६ जणांना अटक करून एक लाख ११ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. अटकेतील आरोपींमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचाही समावेश आहे. अमली पदार्थ तस्करांचे जाळे नष्ट करण्यासाठी पोलिसांकडून यानंतरही अशाच प्रकारची मोहीम राबविण्यात येणार आहे. अमली पदार्थ तस्करांबाबत माहिती असणाऱ्या नागरिकांनी गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षकांच्या ९४२२९४२१०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हेशाखा पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी मानकापूरमधील ताजनगर येथे छापा टाकून जैनुल अब्दुल मुर्तजा अन्सारी, महालमधील चितोर ओळ परिसरातून मोहम्मद अब्दुल ऊर्फ गोलू अब्दुल अजीज, मामा ऊर्फ इस्माइल शेख जब्बार, बजेरियातील मुकेश ऊर्फ पापा तिवारी, गड्डीगोदामधील अभिषेक गौर व जगनाडे चौकातून कली या अमली पदार्थ तस्करांना गजाआड केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT