Drugs given to a friend and Kidnapping
Drugs given to a friend and Kidnapping 
नागपूर

ड्रग्ज देऊन केले १५ वर्षीय मैत्रिणीचे अपहरण

अनिल कांबळे

नागपूर : मोमीनपुऱ्यातील कुख्यात गुंड शानू अन्सारीच्या भावाने दोन साथीदारांच्या मदतीने १५ वर्षीय प्रेयसीचे ड्रग्स देऊन अपहरण केले. तिला दोन दिवसांनी शहरात आणून सोडले. ती नशेच्या धुंदीतच तहसील पोलिस ठाण्यात आली. तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. 

मोहम्मद आफाक ऊर्फ मोहम्मद सलमान मोहम्मद इसराईल अन्सारी (वय २५, रा. मोमीनपुरा) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. पीडित मुलगी सोनम (बदललेले नाव) नवव्या वर्गात शिकते. आफाक हा तिच्या मैत्रिणीचा भाऊ आहे. त्यामुळे तिची आफाकशी ओळख झाली. गांजा आणि ड्रग्स विक्रीशी नाते असलेल्या शानूमुळे आफाकही गुन्हेगारी जगताकडे वळला होता. त्याने सोनमला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 

दोघांच्या वारंवार भेटी होत होत्या. त्याने सोनमला लग्नाचे आमिष दिल्याने ती त्याच्यासाठी जीवही द्यायला तयार होती. २८ सप्टेंबरला पीडित मुलगी कामानिमित्त जात होती. तिच्या मैत्रिणीने तिला आफाक याने बोलाविल्याचा निरोप दिला. दोघीही चौकात गेल्या. तेथे आफाक उभा होता. त्याने दोघींनाही कारमध्ये बसविले. कारमध्ये दोन युवक बसलेले होते. सोनमला रजनीगंधा पुडीमध्ये ड्रग्स खायला दिला. ती खाताच मुलगी बेशुद्ध झाली. 

त्यानंतर आफाक तिला घेऊन गेला. दोन दिवसानंतर त्याने तिला परत तिच्या घराजवळ आणून सोडले. नातेवाइकाने मुलीसह पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आफाक याला अटक केली. तो मुलीला घेऊन कोठे व कशासाठी गेला होता याचा तपास पोलिस करीत आहेत. आफाक हा कोठे घेऊन गेला होता हे मुलीलाही आठवत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तहसील पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पी.पी. राठोड या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

संपादन  : अतुल मांगे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT