drunk drivers traffic police will take action till midnight nagpur sakal
नागपूर

मद्यपींचे वाजणार बारा, कोरोना कमी झाल्याने पुन्हा 'टेस्टिंग' सुरू?

वाहतूक पोलिस रात्री बारापर्यंत करणार कारवाई

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मद्यपान करीत गाडी चालविणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ची कारवाई सुरू केली. मात्र, ही कारवाई केवळ रात्री ९ वाजताच्या सुमारास होत असल्याने त्याच्या वेळेत वाढ करीत रात्री बारा वाजेपर्यंत ही कारवाई करण्यावर वाहतूक पोलिसांचा भर आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मद्यपान करणाऱ्यांचे बारा वाजणार आहे.

पुढल्या आठवड्यापासून त्याची सुरवात होणार, अशी सूत्रांची माहिती आहे. मागील २ महिन्यात राज्यात २२ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कारवाई ही दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी करण्यात आली आहेत.

बार, वाईनशॉपपासून दूर

ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करताना ती एखादा बार आणि वाइन शॉपच्या बाजूला उभे राहून करण्यावर पोलिसांचा भर असतो. मात्र, याला बार आणि वाइन शॉप मालकांचा विरोध आहे. त्यामुळे आता या कारवाया बार, वाईनशॉप पासून दूरच करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे. त्यासाठी जवळपास काही पॉईन्ट नेमण्यात आले आहेत.

अशी आहे शिक्षेची तरतूद

दारू पिऊन गाडी चालवताना पकडल्यास चालकाला २ वर्षांचा तुरुंगवास आणि १५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार, पहिल्यांदा असे केल्यास तुम्हाला १० हजार किंवा ६ महिने तुरुंगवास होऊ शकतो आणि नंतर तुम्ही पुन्हा अशी चूक करताना पकडले गेल्यास, तुम्हाला २ वर्षे तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT