Due to the death of a coronary patient, the area was sealed in Nagpur 
नागपूर

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूमुळे नागपूरचा हा परिसर करण्यात आला सील

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतरंजीपुरा झोनमधील बडी मशीद परिसर महापालिकेने सील केला. या परिसरातून कुणालाही बाहेर जाता येणार नाही तसेच या परिसरात प्रवेशावरही प्रतिबंध लावण्यात आला.

शहरातील सतरंजीपुरा झोनमधील बडी मशीद परिसरातील रहिवासी नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासंबंधी खबरदारी म्हणून सतरंजीपुरा भागाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आयुक्तांनी तत्काळ सतरंजीपुरा झोनमधील बडी मशीद परिसरातील सर्व सीमा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बडी मशीद, सतरंजीपुरा प्रभाग 21 या भागातील निश्‍चित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील उत्तर-पूर्वेस शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, दक्षिण-पूर्वेस रचना कॉम्प्लेक्‍स, दक्षिण-पश्‍चिमेस जुना मोटार स्टॅंड चौक, उत्तर-पश्‍चिमेस मारवाडी चौक टी-पॉइंट असून या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

अत्यावश्‍यक सेवा देणारे शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी, आवश्‍यक तातडीची सेवा तसेच अंत्यविधी, डॉक्‍टर, नर्स, औषध विक्री दुकानदार, पॅथॉलॉजीस्ट, रुग्णवाहिका आदी तसेच पोलिस विभागातर्फे पासधारक असलेल्या जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती वगळता इतर नागरिकांना बाहेर येण्या-जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घ्यावी. कुणीही आवश्‍यकतेशिवाय घराबाहेर पडू नये. नियमित स्वच्छता राखावी. आवश्‍यक मदतीसाठी मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Horoscope : उद्या ३० मार्च! नवा आठवडा 'या' ३ राशीच्या लोकांसाठी धनलाभ योग आणणार; अडकलेले मोठे काम मार्गी लागणार, विदेश दौरा संभवतो

SCROLL FOR NEXT