due to lockdown organ transfer, body donations dropped 
नागपूर

लॉकडाउनमुळे घसरला देहदानाचा टक्का

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्रावर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयांत भर दिला जात आहे. याचा परिणाम अवयव प्रत्यारोपणावर झाला आहे. अनेक शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. पाच महिन्यांत नागपुरात एकही प्रत्यारोपण झाले नाही. तर मरणोत्तर देहदानालाही लॉकडाउनचा फटका बसला असून, पाच महिन्यांत केवळ तीन देहाचे दान मेडिकलमध्ये प्राप्त झाले आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्र विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मृतदेहाची गरज असते. ही गरज देहदानातून पूर्ण होते. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून अत्यल्प देहदान होत आहे. यामुळे बेवारसांच्या मृतदेहांतून मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक अभ्यासाची गरज भागविली जाते. देहदानाबाबत हळूहळू जागरूकता निर्माण होत आहे. सहा तासांच्या आता देहदान झाल्यास अंध व्यक्तीला नेत्रदानाचा फायदा होऊ शकतो. २०१७ या वर्षात उपराजधानीत ३२ जणांनी देहदान केले होते. 

नुकतेच चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू झाले. येथील शरीररचनाशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मृतदेह नव्हते. ही गरज मेडिकलने भागवली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २०१८ मध्ये २७ जणांचे देहदान झाले. तर मेयोत ५ जणांचे देहदान झाले. २०१९ मध्ये मेडिकलमध्ये ३६ तर मेयोत ९ जणांचे देहदान झाले होते. २०२० मध्ये देहदानाचा टक्का खाली आला आहे. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यात १० देहदान झाले. मार्च ते ऑगस्ट दरम्यान केवळ तीन जणांचे देहदान झाल्यामुळे टक्का घसरला आहे. 

मृतदेहाची कोरोना चाचणी 
अलीकडे कोण कधी कोरोनाबाधित होईल, हे सांगणे कठीण आहे. यामुळे देहदान स्वीकारताना ज्या डॉक्टरने उपचार केले होते त्यांचे कोरोना नसल्यासंदर्भातील प्रमाणपत्र असावे लागते. जर असे पत्र नसेल तर मग मृतदेहाची कोरोनासाठी चाचणी केली जाते. कोरोना नसलेल्या मृतदेहाचे दान स्वीकारले जाते, असे मेडिकलच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एन. कामडी यांनी सांगितले. 

(संपादन : प्रशांत राॅय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: लिंबू टिंबू समजणाऱ्या आयर्लंडने इंगा दाखवला; भारतीय गोलंदाजांना झोडले... अय्यरच्या टीमसमोर तगडे लक्ष्य ठेवले

MPSC Prelims Reform: एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी २०२७ पासून नवी पद्धत लागू

Pune University QS ranking drop: राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे विद्यापीठाच्या क्यूएस मानांकनात मोठी घसरण; युवक काँग्रेसचा सरकारवर आरोप

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

SCROLL FOR NEXT