Dasara 2023 esakal
नागपूर

Dussehra Vijayadashami festival : दसऱ्याला का वाटतात आपट्याची पाने ! सीमोल्लंघन, सरस्वती आणि शस्त्र पूजनाचे महत्त्व

आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा आहे. तसेच पाटी पूजन अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - भारताला विविध परंपरा आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे. आपणही त्या आनंदाने पाळतो आणि उत्साहाने सहभागी होतो. कारण यामागे तितकेच चांगले कारणही असते. अशीच एक परंपरा म्हणजे दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्याची. या पानाला विदर्भात आपण सोने असे म्हणतो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केल्यावर देवीचे नवरात्र साजरे केले जाते. त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमीला धन, ज्ञानाची पूजा केली जाते. त्याचेच प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी

दसऱ्याला का वाटतात आपट्याची पाने !

आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याची प्रथा आहे. तसेच पाटी पूजन अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते.

आपट्याच्या पानांचे महत्त्व

आपटयाचे शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना न देता ती आपल्या घरात ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडित आहे. आपट्याची पानं केवळ दसऱ्याला वाटण्यापुरतीच उपयुक्त नाहीत. तर याचे अनेक आरोग्य फायदेदेखील आहेत. अतिसार, तापादरम्यान डोकेदुखी, लघवीमध्ये जळजळ होणे आणि जखमा आणि वेदनेवर आराम मिळतो.

शमी वृक्षाची पूजा

पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आहे.त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते. म्हणूनच या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात, अशी मान्यता आहे.

अशी आहे आख्यायिका

या प्रथेमागे गुरुदक्षिणा देणाऱ्या शिष्य कौत्स व त्यांचे गुरुवर्य ऋषी त्यांच्या गुरुदक्षिणावर आधारित कथा सांगितली जाते. तर आधी नवरात्रात देवीच्या शक्तीरुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला होता. म्हणून विजयाचा दृष्टिकोन समोर ठेवून या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध दसऱ्याच्या दिवशी केला होता. यामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT