नागपूर

‘सायंकाळी किराणा आणूया, सवारी वाहून येतो’ असं म्हणत पडले घराबाहेर अन्...

अनिल कांबळे

नागपूर : इ-रिक्षा (E-rickshaw) घेऊन सवारी मिळविण्यासाठी चालक घराबाहेर पडला. मात्र, नियतीला त्याच्या पोटाचे खळगे भरणे मान्य नव्हते. बैद्यनाथ चौकातून जात असताना भरधाव इनोव्हा कारने रिक्षाला धडक दिली (The car hit). या धडकेत रिक्षाचालक जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी बैद्यनाथ चौकाजवळ घडली. वामन झोडापे (५९, रा चचखेडे ले-आऊट, मंगळवारी) असे अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. (E-rickshaw driver killed in Innova car crash Nagpur crime news)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन झोडापे यांना पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी वामन यांनी ई-रिक्षा घेतला होता. सवारी मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत होते. लॉकडाउन असल्याने लोक अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडतात. त्यामुळे रिक्षाचालकांची कमाई तुटपुंजी आहे. त्यामुळे कोरोनाची भीती वेशीला टांगून तीन मुलांच्या भविष्यासाठी आणि दोन वेळेसच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी वामन रोज सकाळीच रस्त्यावर सवारीच्या शोधात निघायचे.

बुधवारी सकाळी ते बैद्यनाथ चौकाजवळ थांबले. सवारीची वाट पाहत असतानाच अचानक मध्यप्रदेशात नोंदणीकृत इनोव्हा कार भरधाव आली. बैद्यनाथ चौकाकडून ओव्हरटेक करीत अशोक चौकाकडे जात असताना कारचालक आनंद अरखेल (३३, रा. न्यु सुभेदार) याने थेट ई-रिक्षावर कार घातली. अपघात एवढा भयंकर होता की रिक्षाचा चुराडा झाला तर कारने दुभाजकाला धडकून २० फूट फेकली गेली. या अपघातात झोडापे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार चालक अरखेलला ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

घरी किराणाऐवजी आला निरोप

घरातील किराणा संपला होता. त्यामुळे ‘सायंकाळी किराणा आणूया, मी सवारी वाहून येतो.’ अशा निरोप देऊन ते रिक्षा घेऊन घराबाहेर पडले. मात्र, काही तासांतच किराणा ऐवजी वामन झोडापे अपघातात मृत पावल्याचा निरोप आला. पोलिसांनी झोडापे यांच्याकडे मिळालेल्या कागदपत्रांवरून ओळख पटविली आणि कुटुंबीयांना अपघाताबाबत निरोप दिला.

(E-rickshaw driver killed in Innova car crash Nagpur crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT