BHUKAMP 
नागपूर

नागपूर हादरले, भिंतींना तडा, सगळीकडे खळबळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जगात सर्वत्र कोरोनाची दशहत असताना नागपूर जिल्ह्यातील बेलतरोडी परिसर भूकंपाच्या धक्‍क्‍याने हादरला. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. हा धक्का सौम्य असल्याचे सांगण्यात येत असले तरी काही घरांना तडा गेल्या आहेत. भूकंपाच्या धक्‍क्‍याची तिव्रता 1.2 ते 1.5 रिस्टर स्केलचे होते असे हवामान खात्याने कळविले आहे.

शनिवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास बेलतरोडी भागातील नागरिकांना अचानक इमारत, जमीन हलल्याचा भास झाला. हाच अनुभव अनेकांना आल्यामुळे त्याची चर्चा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोन तासाच्या अंतरात तीनदा भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील इतरही काही भागातही अशाच प्रकारचे धक्के बसल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. शहराच्या 20 किलो मीटर क्षेत्रात भूकंपाचे केंद्र असल्याने नेमके केंद्राचे ठिकाण सांगणे कठिण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. भूकंपाचे धक्के जाणवले असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणतीही माहिती नव्हती. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर असे कोणतेच धक्के बसल्याची माहीती आमच्याकडे नसल्याचे सांगितले. एकाने माहिती घेण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

तिन्ही धक्के दोन तासाच्या अंतरामध्ये
हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार नागपूर शहराजवळील बेलतरोडीमध्ये 1 वाजून 39 मिनिटांनी पहिला भुकंपाचा धक्का बसला तो 1.4 रिस्टर स्केलचा होता. त्यानंतर तब्बल 59 मिनीटांनी दुसरा 1.5 रिस्टर स्केलचा धक्का बसला तिसरा धक्का दोन वाजून 41 मिनिटांनी 1.2 रिस्टर स्केलचा होता. यामुळे या परिसरातील काहींनी घरामधील कपाटातील भांडे पडल्याचेही सांगितले. तिन्ही धक्के दोन तासाच्या अंतरामध्ये बसल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने काही काळ मोकळ्या जागेत गोळा झाले होते. माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस ठाण्याचा ताफा परिसरात पोहचला. दरम्यान, त्या घराचा पंचनामा केला. त्यात सुदैवाने कोणतीही हानी झाली नसल्याचे पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT