admission 
नागपूर

CET नंतरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया, शिक्षण विभागाचे शाळांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अकरावी प्रवेशासाठी (eleventh admission) वैकल्पिक सामायिक प्रवेश परीक्षा (CET for 11th admission) घेण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रवेशाला प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, जे विद्यार्थी सीईटी देणार नाहीत त्यांना थेट कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. असे असतानाही शालेय शिक्षण विभागाने सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून अकरावीची प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबवून सीईटीचा निकाल लागल्यावरच प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत. (education department letter to school for eleventh admission process)

शहर आणि ग्रामीण भागात जे विद्यार्थी सीईटीसाठी इच्छुक नाहीत, ते थेट ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असल्याची बाब समोर येत आहे. विशेष म्हणजे शहरासाठी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे अकरावीचे प्रवेश दिले जातात. मात्र, ग्रामीण भागात शाळेत मेरीटवर किंवा 'प्रथम या प्रवेश घ्या' तत्त्वावर प्रवेश दिले जातात. ग्रामीण भागातील बरेचसे विद्यार्थी सीईटी न देता प्रवेश घेण्यास इच्छुक होते. अनेक विद्यार्थी व पालकांनी कनिष्ठ महाविद्यालयात विचारणा करून प्रवेश निश्चिती व्हावी यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु, शिक्षण विभागाने पत्र काढून अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबवावी व सीईटी नंतरच ती सुरू करावी असे निर्देश दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

केंद्रीय प्रवेश समितीद्वारेच प्रवेश -

नागपूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून दिले जातात. समिती लवकरच ११ वीच्या प्रवेशाचे काम सुरू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्जाच्या पार्ट -१ चे काम सुरू केली जाणार आहे. सीईटी झाल्यानंतर पार्ट-२ भरून प्रवेश निश्चितीसाठी अर्ज भरले जातील. १ ऑगस्ट नंतर यासाठीच्या सूचना दिल्या जातील.

सीईटी सर्व्हरमध्ये ‘एरर’ कायम -

अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी नोंदणी करताना तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागल्याने विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी संकेतस्थळ तात्पुरते बंद करण्यात आल्याचा संदेश मंगळवारीच दिसत होता. बुधवारी देखील हाच संदेश संकेत स्थळावर दिसत असल्याने विद्यार्थी सीईटीसाठी अर्ज करू शकले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

KDCC Bank Decision : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना! पात्र शेतकऱ्यांच्या व्याजाचा भार 'केडीसीसी' उचलणार; नफ्यातून भरणार 10 कोटींहून अधिक रक्कम

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

SCROLL FOR NEXT