BJP BJP
नागपूर

२२ घरभेद्यांच्या शोधात भाजप; झाकली मूठ उघडणार

अतिरिक्त मतांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच अपक्ष मते त्यांनी आपल्याकडे वळविल्याचे स्पष्ट होते

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधान परिषदेची निवडणूक (Election of Legislative Council) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी मोठा मतांच्या फरकाने जिंकली असली तरी भाजपच्याही २२ मतदारांनी विरोधात मतदान केल्याचे उघड झाले आहे. त्या घरभेद्यांचा भाजपतर्फे शोध घेतला जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी चोख बंदोबस्त केला होता. आपल्या मतदारांना सुमारे आठ ते दहा दिवस सहलीला नेऊन त्यांना इतरांच्या संपर्काबाहेर ठेवले होते. मतदानाच्या दिवशी सकाळी थेट बसने त्यांनी मतदान केंद्रावर आणले. एकूण ३३४ मतदार भाजपच्या (BJP) खेम्यात होते. एकूण ५५९ मतदारांपैकी निम्मांपेक्षा अधिक मतदान सोबत असल्याने भाजप तशी निश्चिंत होती.

मात्र, अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) शांत बसले नाही. घरभेद्यांचा अंदाजही त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांशी संपर्क केला. मतदान करण्याची विनंती केली. उमेदवार या नात्याने भेटीगाठी घेतल्या. त्याचा सकारात्मक निकालही दिसून आला. त्यांना ३६२ मते मिळाली. काँग्रेस (Congress) समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ तर रवींद्र भोयर यांना एक मत मिळाले. पाच मते अवैध ठरली. तब्बल १७६ मतांची आघाडी घेऊन त्यांनी निवडणूक जिंकली.

अतिरिक्त मतांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच अपक्ष मते त्यांनी आपल्याकडे वळविल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपचा फुटलेल्या मतांची फारशी चर्चा झाली नाही. मूठ झाकली राहिली. पक्षातर्फे बारकाईने आकडेमोड केली असता भाजपची २२ मते फुटल्याचे निदर्शनास (22 voters voted against) आले आहे. ते नेमके कोण याचा शोध घेतला जात आहे. यात काही शहरातील नगरसेवकांचाही समावेश असल्याचे कळते. मात्र, सर्वाधिक फुटलेली मते ग्रामीण भागातील आहेत.

भाजपकडून भांडवल करण्याचा प्रयत्न

काँग्रेस (Congress) समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी असलेल्यांमध्ये भाजपचे सहा सदस्य आहेत. ही बाब निवडणुकीपूर्वीच (Election of Legislative Council) समोर आली होती. भाजपने (BJP) याचे भांडवल करण्याचाही प्रयत्न केला होता. मतदारांंमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी देशमुख आमचेच उमेदवार असल्याचाही दावा भाजपच्या नेत्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT