Eleven year old boy committed suicide in Nagpur 
नागपूर

धक्कादायक! समोस्यासाठी अकरा वर्षांच्या मुलाने घेतला गळफास, वाचा सविस्तर...

अनिल कांबळे

नागपूर : लहान भावाने आणलेला समोसा मोठ्या भावाने खाल्ला. त्यामुळे राग भरलेल्या अकरा वर्षीय लहान भावाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी गिट्टीखदान परिसरात उघडकीस आली. विरू नत्थू साहू (रा. गंगानगर, काटोल रोड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नत्थू साहू हे पत्नी व दोन मुलांसह गंगानगर काटोल रोडवर राहतात. त्यांचा मोठा मुलगा धीरज (वय 13) हा आठवीत तर लहान मुलगा विरू (वय 11) हा पाचव्या वर्गात शिकत होता. नत्थू हे मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. व्यवसाय करण्यासाठी ते नागपुरात आले आहेत. ते हातठेल्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.

नेहमीप्रमाणे नत्थू रविवारी सकाळी भाजीपाला घेऊन घरून निघून गेले. रात्री आठ वाजताच्या सुमारास पत्नी फुलाबाई ही स्वयंपाक करीत होती तर मुले बाहेर खेळत होती. अचानक विरूने समोसा खाण्याची इच्छा व्यक्‍ती केली. त्याने आईला 10 रुपये मागितले. पैसे मिळाल्यानंतर तो लगेच हॉटेलमध्ये गेला आणि समोसा विकत आणला. 

"हात पाय धुतल्यानंतर समोसा खा', असे आईने सांगितल्यामुळे तो बाथरूममध्ये गेला. तेवढ्या वेळात घरात आलेल्या धीरजने किचनमध्ये ठेवलेला समोसा खाऊन घेतला. काही वेळात विरू बाथरूममधून बाहेर आला. त्याने टॉवेलला हातपाय पुसले आणि समोसा खाण्यासाठी किचनमध्ये गेला. त्याला समोसा दिसला नाही. त्यामुळे त्याने रडपड सुरू केली. आईने विचारल्यानंतर धीरजने समोसा खाल्याची कबुली दिली. आईने त्याला पुन्हा दहा रुपये देत समोसा आणण्यास सांगितले. मात्र, तो रूसून बसला. काही वेळानंतर अचानक उठला आणि रूममध्ये गेला.

...अन्‌ घेतला गळफास

विरूने रूमचे आतून दार लावून घेतले. त्याने कपाटातील आईची साडी घेतली. खुर्चीवर चढून ती सिलिंग फॅनला बांधली. फास तयार केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी विरू रूममधून बाहेर येत नव्हता. त्यामुळे आईने दार ठोठावले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. आईने खिडकीतून बघितले असता विरू गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. 

हट्टीपणा घेतोय बळी 
लहान मुलांमध्ये सध्या हट्टीपणा वाढत आहे. जी वस्तू त्याला हवी अन्‌ ती मिळाली नाही तर तो आकांततांडव करतो. त्याचे मनावरील नियंत्रण सुटते. मग ती गोष्ट मिळविण्यासाठी काहीपण करण्याची तयारी असते. म्हणून पालकांनी घरात मुलांना तडजोड करणे शिवकणे आवश्‍यक आहे. मनासारखे घडले नाही की राग येतो. मुलांची प्रत्येक मागणी पूर्ण करू नका. मुलांना काही गोष्टी मुद्दाम देऊ नका. यामुळे त्याची नकार स्वीकारण्याची मानसिक तयारी होते. 
- राजा आकाश, 
मानसोपचार तज्ञ

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: मिसिंग लिंक मार्गावर पुणे–मुंबई वाहतूक बंद; मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सुरळीत

Kolwan Rain : जोरदार पावसामुळे कोळवण खोऱ्यातील जनजीवन विस्कळित; वळकी नदीचे रौद्र रूपामुळे अंतर्गत पुलांवरुन पाणी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी

Latest Marathi News Update: दिवसभरातील पावसाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Khadaki Rain : खडकी भागात मुसळधार पाऊस; गुरुद्वारा आणि टीकाराम महाविद्यालय परिसरात पाणीच पाणी

Computer Typing Examination : नाशिक जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षा स्थगित; मालेगाव केंद्रावरील परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसार..

SCROLL FOR NEXT