Eleventh admission sakal media
नागपूर

नागपूर : अकरावी प्रवेशासाठी अखेरची फेरी मंगळवारपासून

प्रवेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या स्तरावर पडताळणी केल्यावर होणार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या माध्यमातून शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपल्याचे मानले जात असतानाच अचानक राज्याच्या शिक्षण संचालनालयाने प्रवेशाची अखेरची फेरी राबविण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. २८) ते ३० डिसेंबरदरम्यान विद्यार्थी अकरावीमध्ये प्रवेश घेऊ शकतील. हे सर्व प्रवेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या स्तरावर पडताळणी केल्यावर होणार आहेत.

अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या निकालानंतर शहरातील २१८ कनिष्ठ महाविद्यालयामधील ५९ हजार १९५ जागांसाठी ऑगस्ट महिन्यात प्रवेश प्रक्रियेस सुरवात करण्यात आली होती. त्यासाठी ३६ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, आत्तापर्यंत सात फेऱ्यांमध्ये ३३ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविले. यापैकी सर्वाधिक पहिल्या फेरीत ११ हजार ५२३ प्रवेश देण्यात आले. मात्र, त्यानंतर प्रक्रियेला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली. त्यामुळे आत्तापर्यंत २५ हजार २४५ जागा रिक्त असल्याचे दिसून आले आहे.

विशेष म्हणजे यासाठी आतापर्यंत प्रवेशासाठी सात ते आठ फेऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. आता नव्याने सुरू होणाऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना आधी नोंदणी करावी लागले. दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणारे व प्रवेश घेऊ न शकलेले यासह एटीकेटी प्राप्त विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. त्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त जागा तपासून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी अलॉटमेंट केले जाणार असून त्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. यानंतर प्रवेशाची कोणतीही फेरी राबविण्यात येणार नसल्याचे या अधिसूचनेत नमूद आहे.

२५ हजारावर जागा रिक्त

नागपूर शहरातील केंद्रीय प्रवेश पद्धतीने दिलेल्या माहितीनुसार ६ डिसेंबरपर्यंत कला शाखेत ५ हजार ३६७, वाणिज्य ८ हजार ७५२, विज्ञान ८ हजार ९३८ व एमसीव्हीसी शाखेमध्ये २ हजार १८८ जागा अशा एकूण २५ हजार २४५ जागा रिक्त आहेत. यामुळे अखेरच्या फेरी राबविण्यात यावी, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून केली होती. आता जवळपास सर्वच अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झाले असल्याने ही फेरी राबविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सख्खे भाऊ, सख्खे व्याही! पाकच्या लष्करप्रमुखांनी लेकीचं लग्न भावाच्या मुलाशी लावून दिलं, लष्कराच्या मुख्यालयात लग्नसोहळा

Kolhapur Political News : घराणेशाहीला विरोध करणाऱ्या महायुतीकडूनच नेत्यांच्या वारसांना प्राधान्य, कोल्हापूरकरांची भूमिका काय?

Latest Marathi News Update : नागपूरात भाजपच्या उमेदवारी यादीत घराणेशाहीची छाया

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

Bhandup BEST Accident : भाजी कोणती आणू? पतीनं फोनवरून विचारलं, पत्नीचं उत्तर ऐकण्याआधीच गेला जीव

SCROLL FOR NEXT