So many vacancies in the first round of the eleventh? 
नागपूर

बापरे! अकरावीचे इतके विद्यार्थी गेले कुठे? प्रवेशासाठी तब्बल इतक्या जागा रिक्त

मंगेश गोमासे

नागपूर : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी ३० ऑगस्टला प्रकाशित करण्यात आली. यानुसार अकरावी प्रवेश प्रक्रियेत ४ सप्टेंबरपर्यंत ५९ हजार ४० जागांपैकी केवळ १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. ४५ हजार ७१६ जागा रिक्त राहील्या आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत एकूण ४० हजार ९९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी ३३ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी अर्जाचा प्रथम भाग तर ३३ हजार ५६२ विद्यार्थ्यांना दुसरा भाग भरला आहे. तसेच प्रक्रियेत २९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी ऑप्शन भरले होते.

२३ ऑगस्टला प्रवेशाची तात्पूरती यादी प्रकाशित करण्यात आली. यात अर्जाचा पहिला भाग भरलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यावर २५ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्यात आलेत. याच दिवशी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. यामध्ये कोट्यातून प्रवेश घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले होते.

विशेष म्हणजे दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरुन लॉक करण्यात आला. ३० ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली. तसेच ३१ऑगस्टपासून तर ५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदविले. यामध्ये केवळ १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून ४५ हजार ७१६ जागा रिक्त राहील्या आहेत.

दुसऱ्या यादीसाठी ७ जूनपर्यंत नोंदवा ऑप्शन

पहिल्या फेरीचे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून दुसऱ्या यादीसाठी ७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना ऑप्शन नोंदवायचे आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना पहिला व दुसरा भाग भरता येणार आहे. यानंतर १० तारखेला सकाळी १० वाजता दुसरी यादी प्रकाशित केली जाईल. १२ सप्टेंबरदरम्यान या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.

विभाग   जागांची संख्या ऑप्शन भरलेले अर्ज प्रवेश (प्रथम फेरी)
कला ९,६६० २,६०९ १,६०५
वाणिज्य १७,९२० ८,५१० ३,९४८
विज्ञान २७,३३० १६,९४९ ७,१४३
एमसीव्हीसी ४,१३० १,०९१ ७५८

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

Marathi News Live Updates : अभिनेता कबीर दुहान सिंग याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

Akola News: दुष्काळी संकटाचे सावट, खरीप पिकांची अवस्था गंभीर; शिवार फेरीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT