Engaged in Gramsevak Party in Mouda taluka 
नागपूर

ग्रामसेवक म्हणाले, ‘मी रामटेकला पार्टीत आहे, कामाच नंतर बघू’; दोन दिवसांच्या सुट्टीत यांच काही भागत नाही

पुरुषोत्तम डोरले

मौदा (जि. नागपूर) : कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कामकाजातून थोडी उसंत मिळावी म्हणून शासनाने पाच दिवसांचा आठवडा करून शनिवार व रविवारला सुट्टी दिली. मात्र, असे असतानासुद्धा शासकीय कामे या पाच दिवसांमध्ये प्रामाणिकपणे करण्याची कर्मचाऱ्यांची वृत्ती दिसून येत नाही. बुधवारी तर कहरच झाला. पं. स.मधील बहुतांश ग्रामसेवक चक्क पार्टीत व्यस्त असल्याची ‘ऑखों देखी’ पाहायला मिळाली.

मौदा पंचायत समितीअंतर्गत ६२ ग्रामपंचायत असून, ३१ ग्रामसेवक व ७ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी ४ ग्रामसेवक विविध कारणास्तव रजेवर आहेत. विविध कारणे सांगून कार्यालयाला दांडी मारण्याची कित्येक कर्मचाऱ्यांमध्ये एकप्रकारे ‘क्रेझ' बनलेली आहे.

मात्र, बुधवारी (ता. ३) कमालच झाली. एक-दोन नव्हे तर तालुक्यातील असंख्य ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी चक्क कार्यालयीन कामकाजाला दांडी मारून रामटेक येथील एका रिसोर्टमध्ये पार्टी करायला गेले होते.

प्रतिनिधीला याबाबत चाहूल लागताच खंडाळा येथील उपसरपंच संकेत झाडे, नेरला येथील उपसरपंच मनोज कडू व निसतखेडा येथील उपसरपंच राकेश चव्हाण यांच्यासह संबंधित रिसोर्टला भेट दिली.

यावेळी पंचायत समिती मौदाचा बहुतांश कर्मचारीवर्ग पार्टीमध्ये मग्न असल्याचे दिसून आले. यामध्ये काही पंचायत समितीच्या मोठ्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आमच्या प्रतिनिधीने दुपारी ३ वाजता दोन ग्रामसेवकांना फोन केला असता मी रामटेकला आहे, असे उत्तर ऐकायला मिळाले.

मला कल्पना नव्हती
रामटेकला पार्टी असल्याबाबत मला कल्पना नव्हती. संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याबाबत माझी परवानगी घेतली नाही. 
- दयाराम राठोड,
गटविकास अधिकारी, मौदा

अन्यथा आंदोलन पुकारले जाईल
मौदा पंचायत समितीत कार्यरत कर्मचारीवर्ग जनतेच्या कामकाजाविषयी गंभीर दिसून येत नाही. शासन निर्णयानुसार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे, अन्यथा आंदोलन पुकारले जाईल. 
- रोशन मेश्राम,
ग्रामपंचायत सद, नेरला

साहेबऽऽ ऑफिसमध्ये किती वाजता याल जी?
शासनाच्या नियमानुसार बहुतेक ग्रामसेवक हे मुख्यलयी राहत नाहीत. सुट्टीचा दिवस न पाहता यांना कामाच्या दिवसी काही ग्रामसेवकांना रामटेक जाऊन रिसॉटमध्ये पार्टी देतात. काही नागपूर तर काही भंडाऱ्यावरून ये-जा करीत आहेत. कधी पंचायत समिती तर कधी कुठे असतात. त्यामुळे गरजू नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागतो. गरजू लोकांना फोन करून विचारावे लागते, साहेब ऑफिसमध्ये किती वाजता यालजी? त्यामुळे यांना मुख्यालयी राहणे गटविकास अधिकारी यांनी सक्तीचे करावे. 
- संकेत झाडे,
उपसरपंच, खंडाळा (गांगणेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT