engineer committed to suicide in nagpur 
नागपूर

फ्लॅट लिलावाची नोटीस येताच अभियंत्यानं उचललं धक्कादायक पाऊल, कुटुंबीयांना बसला धक्का

अनिल कांबळे

नागपूर : फ्लॅट लिलावाची नोटीस आल्यामुळे तणावात आलेल्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सच्चिदानंदनगर येथे सोमवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अविश नारायणराव शेंडे (वय ४२) असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा - कालव्यात दिसला कुत्रासदृश्य प्राणी, जवळ जावून बघताच उडाली भंबेरी
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये नागपूर सुधार प्रन्यासने रस्ता दुभाजकावर झाडे लावण्यासाठी निविदा काढली. अविश आणि त्याच्या मित्रांनी कंत्राट मिळविण्यासाठी अर्ज केला. कंत्राट मिळविण्यासाठी अविश यांनी बँकेत फ्लॅट गहाण ठेवला. ही रक्कम नासुप्रकडे जमा केली. मात्र, त्यांना कंत्राट मिळाले नाही. कंत्राट न मिळाल्याने जमा केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी अविश यांनी नासुप्रकडे अर्ज केला. अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. यादरम्यान, काही दिवसांपूर्वी फ्लॅटचा लिलाव करण्यासाठी बँकेने त्यांना नोटीस पाठवली.

फ्लॅटचा लिलाव होत असल्याने अविश तणावात राहायला लागले. रविवारी रात्री त्यांनी छतावरील टिनाच्या शेडला वायर बांधून गळफास घेतला. सोमवारी पहाटे नातेवाइकांना ते गळफास लावलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अविश यांच्या मागे पत्नी, दोन अपत्ये आहेत. अविश यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपण त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप अविश यांच्या मित्रांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT