The engineer created the exact train ticket
The engineer created the exact train ticket 
नागपूर

धक्कादायक! अभियंत्याने चक्क रेल्वेचेच हुबेहुब तिकीट केले तयार; लोहमार्ग ठाण्यात गुन्हा दाखल

योगेश बरवड

नागपूर : ठगबाजांसह सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी अवलंबिले जाणारे विविध फंडे उजेडात येत आहेत. पण, एका अभियंत्याने चक्क रेल्वेचेच हुबेहुब तिकीट तयार केले. तेच वापरून त्याचा प्रवासही सुरू होता. परंतु, कर्तव्यदक्ष तिकीट निरीक्षकाने त्याचे बिंग फोडले. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वशिष्ठ महर्षी (२६) असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, वशिष्ठ महर्षी याने १२६९२ दिल्ली-बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसचे भोपाळ ते सिकंदराबाद प्रवासाचे हुबेहुब तिकीट मोबाईलवर तयार केले. ते तिकीट आपल्याच दुसऱ्या मोबाईलमध्ये पाठवले. त्याच तिकिटाच्या मदतीने तो भोपाळहून राजधानीच्या बी-१० बोगीत चढला. मागोमाग तिकीट तपासणीस नवीनकुमार कुमावतही बोगीत आले आणि प्रावाशांकडील तिकिटांची तपासणी सुरू केली.

वशिष्ठला तिकीट विचारले असता त्याने मोबाईलवरील तिकीट दाखविले. या तिकीटेवर कोच बी-१० आणि बर्थ २० असे नमुद होते. विशेष म्हणजे या बोगीतील २० नंबरची बर्थ रिकामीच होती. शंका आल्याने कुमावत यांनी रेल्वेचा चार्ट तपासला. मात्र, मोबाईलवरील तिकिटावर उल्लेखीत पीएनआर नव्हता. यामुळे वरिष्ठांना प्रकरणाची माहिती दिली.

गाडी नागपुरात आली असता विशिष्ठला उतरवून आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत प्राथमिक चौकशीनंतर हे प्रकरण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी विश्वासघातचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक विजय तायवाडे यांनी गुरुवारी तिकीट तपासनीस नवीन कुमार कुमावत आणि प्रमोद कुमार शॉ याचे बयान नोंदविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT