nagpur-high-court Sakal
नागपूर

अल्पवयीन मुलगी सहमत असली तरी तो बलात्काराच; नागपूर खंडपीठ

बलात्कार प्रकरणात आरोपीला अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून अर्थ नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला.

सकाळ वृत्तसेवा

बलात्कार प्रकरणात आरोपीला अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून अर्थ नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला.

नागपूर - बलात्कार प्रकरणात (Rape Case) आरोपीला (Accused) अल्पवयीन मुलीने (Minor Girl) शरीरसंबंधास (Sexual Intercourse) दिलेल्या सहमतीला कायद्याच्या (Law) दृष्टिकोनातून अर्थ नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Court) केला. पीर मोहम्मद घोटू मोहम्मद इस्माईल (२३) असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आरोपीने उच्च न्यायालयात (High Court) अपील दाखल केले होते.

या प्रकरणी न्यायमूर्ती विनय देशपांडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या समक्ष सुनावणी झाली. आरोपीविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ॲट्रॉसिटी इत्यादी गुन्हे नोंदनों विले आहेत. आरोपी व पीडित मुलीचे एकमेकांवर प्रेम होते. मुलगी स्वत:हून आरोपीसोबत पळून गेली व तिने आरोपीसोबत स्वत:च्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले, असे मुद्दे उच्च न्यायालयात मांडून जामीन मागण्यात आला होता. उच्च न्यायालयाने ते मुद्दे अमान्य केले.

कायद्याच्या दृष्टिकोनातून अल्पवयीन मुलीच्या सहमतीला काहीच अर्थ नाही. याशिवाय, मुलीने तिच्या बयाणामध्ये ती आरोपीवर प्रेम करते, असे कुठेही म्हटले नाही. आरोपीच तिच्यावर प्रेम करण्यासाठी दबाव टाकत होता. आरोपीने मुलीच्या लहान भावाला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती आरोपीसोबत पळून गेली. वैद्यकीय पुराव्यांवरून आरोपीने बलात्कार केल्याचे दिसून येते. याशिवाय सरकारच्या साक्षीदारांनीही आरोपीविरुद्ध बयाण दिले आहे. परिणामी, आरोपीला जामीन दिला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT