नागपूर

नागपुरातील हत्याकांड : आलोकमुळे सारेच होते त्रस्त; करायचा छळ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : क्रुरकर्मा आलोक रात्री अपरात्री कधीही सासूकडे जायचा. मेहुणी अमिषाचा सतत छळ करायचा. अगदी उच्छाद मांडला होता. यामुळेच सुमारे चार महिन्यांपासून त्याचे सासरी येणे बंद केले होते. पत्नीचा छळ करण्यातही त्याने कसूर ठेवला नाही. त्याच्यामुळे सारेच त्रस्त होते. दरम्यान, त्याने हत्येपूर्वी मेहुणीवर अत्याचार केल्याची दाट शंका असल्याने मृतदेहांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. पोलिसांनी त्यासाठी अर्ज दिल्याचीही माहिती आहे. (Everyone-was-suffering-by-aalok)

पाचपावलीतील बागल आखाड्याजवळ भाड्याने राहणारा आलोक मातूरकर (४५) याने पत्नी विजया (४०), मुलगी परी (१५), मुलगा साहील (१२), सासू लक्ष्मी बोबडे (५५) व मेव्हणी अमिषा (२१) यांची दोन वेगवेगळ्या घरांमध्ये हत्या केली. त्यानंतर स्वतःही नायलॉन दोरीने बांधून गळफास लावून आत्महत्या केली. समाजमन सुन्न करणारी ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.

मंगळवारी दुपारी शवविच्छेदनानंतर मातूरकर कुटुंब व मायलेकींवर मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत वेगवेगळे अंत्यसंस्कार करण्यात आले. बागल आखाड्याजवळील मातूरकर राहत असलेले घर आणि बोबडे मायलेकींचे वास्तव्य असलेले पटवी गल्ली येथील घरासमोर मंगळवारी स्मशान शांतता होती. समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी आप्तेष्टांपैकी सारेच बोलणे टाळत होते.

आलोकने अगदी कसायाप्रमाणे साहील वगळता अन्य चारही जणांचे गळे चाकूने चिरल्याची बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी दोन्ही घरांमधून मोबाईल जप्त केले असून बारकाईने तपास केला जात आहे. अमिषा खासगी काम करायची. यामुळे ती घरी आल्यानंतर आलोक कसलाही विचार न करता रात्री अपरात्री कधीही तिच्या घरी यायचा. अमिषाला बोलण्यासाठी गच्चीत घेऊन जायचा, संबंधांची मागणी करायचा. तीसुद्ध सततच्या जाचाला कंटाळली होती. विरोध करूनही आलोक जुमानत नसल्याने सुमारे महिनाभरापूर्वी तिने अत्याचाराची तक्रार पोलिसात दिली होती. मात्र, ती लगेचच मागेही घेतली.

मेहुणीविषयी त्याच्या मनातील भावना लक्षात आल्यामुळे मातूरकर पती-पत्नीचा नियमित वाद व्हायचा. पत्नीचाही तो छळ करीत होता. तूर्त पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असून त्यावरून अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत. अमिषाने जवळच्या मैत्रिणीला भावजींकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. या मैत्रिणीचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

२७ मिनिटांची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

अमिषाच्या मोबाईलमधील २७ मिनिटांची ऑडोओ क्लिप पोलिसांच्या हाती लागला आहे. काहीतरी विपरीत घडणार असल्याची कल्पना असल्याने आलोक येताच तिने ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केली असण्याची शक्यता आहे. ऑडियोतील प्रारंभीच्या काही मिनिटांमध्ये दोघांमध्ये प्रेमपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर अचानक आलोक चिडतो. संतापाच्या भरात त्याने अमिषाला थापड मारल्याचा आवाज आहे. त्यानंतर काहीतरी धडपड सुरू असल्याचे भासते. काहीवेळ शांततेनंतर लक्ष्मी यांचा आवाज असून ‘जावई तुम्ही हे काय केले?’ अशी विचारणा केली आहे. त्यानंतर लक्ष्मी यांचाही खून झाल्याचे लक्षात येते.

(Everyone-was-suffering-by-aalok)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT