file
file 
नागपूर

काटोलात खळबळ, तीन दिवस राहणार सगळे व्यवहार बंद, काय प्रकरण आहे,....

सकाळ वृत्तसेवा

काटोल (जि.नागपूर) : रविवारी शहरात सर्वाधिक 8 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आठवड्यात रुग्ण संख्या एकूण अकराच्यावर पोहोचली असून यात आंध्र प्रदेश कनेक्‍शन सोबत दुसऱ्या रायगड येथून आलेल्या रुग्णामुळे कोरोना रूग्ण संख्या वाढणार का, अशी धास्ती व्यक्‍त होत आहे.

अधिक वाचा : सीमा तपासणी नाक्‍यावर दिवसाला 10 लाख कमाई, अधिकारी मालामाल, काय आहे प्रकरण...

शनिवारी रात्री व रविवार सकाळी काटोल शहरात कोविड- 19 चे मोठ्या प्रमाणात रुग्ण निघाल्याच्या चर्चांना ऊत आला. त्यात नजीकच्या झिलपा व पानवाडी या गावातून प्रत्येकी एक रुग्ण
सापडल्याने काटोल शहरासोबत ग्रामीण परिसरसुद्धा हादरला. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता
जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे.

अधिक वाचा : बनवेगिरी...एकाच नावाने तीन शाळांमध्ये प्रवेश

काटोल राहणार तीन दिवस बंद
शहरात एकाच दिवशी आठ रुग्ण मिळाल्याने तसेच रग्ण सातत्याने वाढत असल्याने आकडा एकरावर गेला आहे.यापूर्वी रिधोरा कनेक्‍शनमधील तीन रुग्ण काटोल राऊतपुरा येथील आढळून आले होते. त्यानंतर आता तीन हप्त्यानंतर आंध्र कनेक्‍शनमधून अकरा रुग्ण संख्या वाढल्याने काटोल बाजारपेठ, सोमवार, मंगळवार, बुधवारला पूर्णपणे तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन व्यापारी संघ व व्यापारी कल्याणकारी संघ यांनी जाहीर केले आहे.

मोठी बातमीः निरोगी व्यक्‍तीवर होणार कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी, नागपुरातील या रूग्णालयात सुविधा...

पानवाडी रुग्णाचे रायगड "कनेक्‍शन'
आज काटोलपासून 3 किलोमीटर अंतरावरील पानवाडी गावातील रुग्ण रायगड येथून आलेला असून
होमक्वांरटाइन असल्याची सूत्रांनी माहिती दिली. रविवारी त्याचे लाळेचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने
संपर्कात येणारे मंडळींनासुद्धा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. शहरात ग्रामीण शहरी रुग्ण वाढ लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन समितीने जनतेला दक्षता बाळगण्याचे आवाहन एसडीओ श्रीकांत उंबरकर यांनी केले आहे.

भानेगावात पुन्हा "पॉझिटिव्ह'
खापरखेडा : परिसरातील नवीन भानेगाव येथे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एक रुग्ण "ट्रॅव्हलिंग हिस्ट्री'मुळे पॉझिटिव्ह आल्याने भानेगावात चिंतेचे सावट पसरले आहे. हा कोरोनाबाधित रुग्ण रायगड येथे कामानिमित्त सहकर्मी कामगारांसोबत गेला होता. त्याचे साथीदार कामगार ही एकाच गाडीने प्रवास करीत नागपूरला दोन जुलै रोजी पोहोचले आणि कंपनीच्या गाडीने प्रत्येकाला सोडण्यात आले. भानेगावातील बाधित रुग्ण 2 जुलैला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पोहोचला आणि लागलीच तीन जुलै रोजी चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीकरिता गेला. मात्र, त्याला कुठलाही त्रास नव्हता. तरीही त्याच्या कंपनीने रामदासपेठ येथील एका खासगी पॅथॉलॉजीमध्ये कोव्हिड-19 चाचणी चार जुलै रोजी केली. त्या सर्व कामगारांना सीए रोड नागपूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात आले. परंतु, पाच जुलैला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तारांबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT