fake call from ED office to the social welfare officers in nagpur 
नागपूर

'मी ईडी कार्यालयातून बोलत आहे, घोटाळेबाजांचे नंबर द्या', थेट समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांना फोन

नीलेश डोये

नागपूर : समता प्रतिष्ठानमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देताच ईडी कार्यालयही सक्रिय झाले. 'मी ईडी कार्यालयातून बोलत आहो, घोटाळ्यातील कर्मचाऱ्यांचे नंबर द्या, असे फोन समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना येऊ लागले आहेत. फोन बोगस असून याप्रकरणी प्रशासनाची तक्रार दाखल करण्याची तयारी असल्याची माहिती आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये १६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केला. यामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. याप्रकरणी काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा केली. त्यानुसार १३ कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले. परंतु, हे सर्व कर्मचारी कंत्राटी आहेत. त्यामुळे वरिष्ठांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता फक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच बळी घेण्यात आला. या प्रकरणाचा काहींकडून फायदा घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे. दुपारच्या सुमारास समाजकल्याण विभागाच्या लँडलाईवर फोन आले. 'मी ईडी कार्यालयातून बोलत आहो. घोटाळाप्रकरणी काहीचे नावे समोर आली. त्यांचे मोबाईल नंबर द्या', असे त्याच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर एकाच्या मोबाईलवर संबंधित व्यक्तीचा फोन आला. विशेष म्हणजे कॉलरआडीवर ईडीचे लोगो दिसत होते. तपासणी केली असता संबंधित व्यक्ती ईडीमध्ये नसल्याचे दिसून आले. 

ईडी कार्यालायातून बोलत असल्याचा निनावी फोन आला. तो बोगस असल्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात येईल. 
- शीलवंत चाहांदे, लेखा अधिकारी, समता प्रतिष्ठान. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT