fake degree certificate 3 student get job in iraq crime police investigation education marathi news  Sakal
नागपूर

Nagpur News : तीन विद्यार्थी बोगस पदव्यांसह चार वर्षे होते देशात

वास्तव्या दरम्यान केले काय ? ः इराक दूतावासाची विद्यापीठाला माहिती

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बनावट पदव्यांच्या आधारे इराकमध्ये नोकरी मिळविल्याचा खुलासा समोर आला होता. इराक दूतावासाने या पदव्या तपासणीसाठी विद्यापीठाला पाठविल्या होत्या. दरम्यान या पदव्यांच्या आधारावर तब्बल चार वर्षे तीन विद्यार्थी देशात राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात इराक दूतावासाकडून विद्यापीठाच्या साकोलीतील बाजीराव करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, वर्धेतील बापूराव देशमुख अभियांत्रिकी, शहरातील डॉ. आंबेडकर या महाविद्यालयांना पत्र आले होते.

त्यात विद्यार्थ्यांची नावे देत, ते विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयात शिकले काय? अशी विचारणा केली होती. दरम्यान विद्यापीठाशी संपर्क साधून विद्यापीठाला लोगो आणि अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या पदव्या आणि गुणपत्रिकांची तपासणी करण्याबाबत दूतावासाने कळविले होते. तपासात त्या २७ विद्यार्थ्यांच्या पदव्या बनावट असल्याची माहिती समोर आली होती.

यातील २२ विद्यार्थी हे एकट्या फार्मसी शाखेतील होते. विद्यार्थ्यांच्या या पदवी २०१७, २०१९ आणि २०२० या सालातील असल्याचे दिसून आले. दरम्यान यापैकी ३ विद्यार्थी हे बोगस पदवी मिळवीत, देशातच कुठेतरी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत विद्यापीठाने परराष्ट्र विभाग, गृहविभाग आणि इतर संबंधित विभागालाही माहिती दिली होती. त्यानंतर काही महिन्यांनी याबाबत विचारणा करण्यात आल्यावर दूतावासाकडून अशी माहिती दिल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ३ विद्यार्थी देशात राहून काय करून गेले? याबाबत आता शंकांना उधाण आले आहे.

पोलिसांना केवळ माहिती

इराक येथील दूतावासामुळे बनावट पदवीचे रॅकेट समोर आल्यावर विद्यापीठाद्वारे कुठलाही सहभाग नसल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत सर्व विभागांसह अंबाझरी पोलिसांनाही माहिती देण्यात आली. दरम्यान विद्यापीठाचा लोगो आणि नावाचा वापर झाल्याची तक्रार दिली असता, त्याबाबत पोलिसांकडून चौकशी करणे शक्य होते.

तपास यंत्रणा चौकशी करणार काय?

२०१७ ते २०२० या दरम्यान विद्यार्थ्यांनी पदवी मिळविल्याची माहिती आहे. यादरम्यान ते देशात असल्याची माहिती आहे. मात्र, यादरम्यान ते कुठे होते, त्यांनी काय केले? हे कुणालाही माहिती नाही. इराकला गेल्यावर कागदपत्रांच्या तपासणीनंतर ही बाब उघडकीस आली हे विशेष. त्यांनी याबाबत गुन्हाही दाखल केला. गेल्या काही दिवसापासून एनआयए आणि इतर तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरू आहे. त्यातच व्हीएनआयटीचा शाहनवाज यालाही दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यामुळे आता याबाबतही तपास यंत्रणा चौकशी करणार काय? हा प्रश्‍न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकाला मारहाण; मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हा

Crime News: लग्न जमत नव्हत... शेवटी ठरलं पण पत्नी निघाली 'दरोडेखोर वधू', नवरा लावायचा नवीन तरुणांशी लग्न! अशा प्रकारे झाला पर्दाफाश

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

SCROLL FOR NEXT