file 
नागपूर

मेट्रोच्या फेसबुक पेजवर चाहत्यांच्या उड्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पाच वर्षांपूर्वी नागपूरकरांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरू करण्यात आलेले महामेट्रोचे फेसबुक पेज आज साडेपाच लाख नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे. दर आठवड्यात तीन लाख नागरिक या पेजला भेट देत असून, 70 हजार नागरिक "लाइक्‍स' करीत महामेट्रोच्या विविध उपक्रम, कार्यक्रमांना प्रतिसाद देत आहेत. 
 


पहिल्या क्रमांकावरील मेट्रो फेसबुक पेज 
गेल्या पाच वर्षांत महामेट्रोचे फेसबुक पेज अनेकांची सवय झाली आहे. त्यातून चाहत्यांचा आलेख सातत्याने वाढत आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर या पेजवर मिळत असल्याने झपाट्याने चाहता वर्ग निर्माण झालेले शहरातील हे लोकप्रिय अव्वल फेसबुक पेज आहे. देशभरातील सर्व शासकीय विभागांच्या तुलनेत सर्वांत जास्त "फॉलोअर्स' असलेले पहिल्या क्रमांकावरील मेट्रो फेसबुक पेज ठरले आहे. मेट्रोच्या फेसबुक पेजवर नागरिकांना सतत प्रकल्पाविषयी अद्ययावत माहिती दिली जाते. प्रकल्पाचे बांधकाम, स्थानकांच्या स्थापत्य कलेशी संबंधित माहिती, बाह्य-आंतरिक सज्जा, प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक माहिती, वापरण्यात येणाऱ्या यंत्रांविषयी माहिती, कार्यादरम्यानची आकर्षक छायाचित्रे या पेजवर शेअर केली जातात. अनेक ऑनलाइन स्पर्धा, विविध उपक्रमदेखील आयोजित केले जातात. येथे नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले जाते. "लाइक, कमेंट्‌स व शेअर'च्या माध्यमातून एका आठवड्याला तीन लाखांवर नागरिक पेजला भेट देत आहेत. 17 हजार नागरिकांशी संवाद साधला जात आहे. 70 हजार नागरिक आठवडाभऱ्यात कुठल्या तरी स्वरूपात पोस्टवर प्रतिसाद देतात. दर महिन्याला "मेट्रो संवाद'मधून वरिष्ठ अधिकारी नागरिकांशी हितगूज साधत आहेत. 


"फेसबुक लाइव्ह'ला उदंड प्रतिसाद 
नागरिकांच्या फायद्याचे असणारे काही माहितीपूर्ण कार्यक्रम "फेसबुक लाइव्ह' स्वरूपात, तर व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांच्या नागरिकांसाठी असलेल्या सूचना अनेकदा व्हिडिओ रूपात नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. मेट्रोच्या वर्धा व हिंगणा मार्गावरील उद्‌घाटन सोहळ्याचा आनंद नागरिकांनी फेसबुक लाइव्हद्वारेही लुटला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update : पादुका दर्शनासाठी सज्ज होतोय 'भक्तीचा महाकुंभ'; वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सवाला होणार सुरुवात

MP EOW Controversy : एक वर्षाच्या बालकावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेचा पराक्रम

Chhatrapati Sambhajinagar News: अवकाळी पावसाचा मोठा फटका; हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

PM Kisan 22nd Installment : 'पीएम किसान'चे 93 कोटी खात्यात जमा झाले, पण 'या' चुकीमुळे 11 हजार शेतकऱ्यांचे पैसे अडकले; त्वरित करा हे काम!

SCROLL FOR NEXT