पचखेडी ः सरपंच दिनेश पडोळे यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पिकात चालवत असलेले "रोटावेटर'.  
नागपूर

काय झाले, का चालविले शेतकऱ्याने हरबऱ्यावर "रोटावेटर' ?

सकाळ वृत्तसेवा

पचखेडी (जि.नागपूर)   : निसर्गाच्या लहरीपणामुळे नगदी पीक हरभरा हातून गेल्याचे पाहून गोन्हा येथील एका शेतकऱ्याने उभ्या पिकावर "रोटावेटर' फिरविले. ग्रामसभेत नुकसानभरपाईच्या मागणीचा ठराव घेण्यात आला. नुकसानभरपाई द्या, अन्यथा सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यंदा निसर्गाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले. खरीप हंगामाने शेतकऱ्यांना दगा दिल्यावरही बळीराजा न खचता रब्बी पिकासाठी उसनवारी व व्याजाने पैसे घेऊन खरीप पिक घेण्यासाठी सज्ज झाला होता. नुकसानभरपाई मिळेल या आशेने त्याने हरभरा, गहू या नगदी समजल्या जाणाऱ्या पिकांची लागवड केली. सुरुवातीला पीक डौलदार दिसू लागले. उसनवारी व व्याजाच्या पैशाची परतफेड करून मुलाबाळांचे शिक्षण, वर्षभराच्या गरजा पाहून शेतकऱ्याने पद्धतशीर नियोजन केले. मात्र, जानेवारी महिन्यात निसर्ग कोपला व हातचे हरभऱ्याचे पीक गेले.

नुकसानभरपाई द्या !

आता हरभऱ्याचे पीक हातून गेले. काहीच पीक होणार नसल्याचे लक्षात येताच नाइलाजाने शेतकऱ्याने उभ्या हरभऱ्याच्या पिकात "रोटावेटर' चालवल्यानंतर पीक प्राण्यांना चारा म्हणून खायला दिले. या गंभीर प्रश्‍नाकडे शासन, प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. आधीच गोन्हा, चिखली हे गाव पुनर्वसित असल्याने त्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असते. तेव्हा येथील शेतकऱ्यांची अडचण शासनस्तरावर लक्षात आणून देण्यासाठी ग्रामपंचायत गोन्हा येथे ग्रामसभा घेऊन तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, असा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

अन्यथा सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा

जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार राजू पारवे यांना पत्रकाद्वारे ठराव कळविला आहे. तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांच्या वतीने गोन्हाचे सरपंच दिनेश पडोळे, धनराज भोतमांगे, नरेंद्र तुमसरे, बाबूराव लुटे, प्रल्हाद मेश्राम, विठ्ठल रामटेके, रामभाऊ उके, दादूजी तुमसरे, शुभम उके, पुरुषोत्तम तुमसरे, तुळशीदास लुटे, तुळशीदास बोरकर, दशरथ लुटे, शांताराम शेबे, काशीनाथ शेबे, मंसाराम मते यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Japan Earthquake: जपानमध्ये एक विनाशकारी भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी, हजारो लोकांचे स्थलांतरण, तीव्रता किती?

Dhule Mmunicipal Election : धुळे मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर!माजी आमदार फारुक शाह यांचा दावा; "महापौर आमचाच"

Zudio Scam : स्वस्तात मस्त म्हणत मोठी लूट? 'झुडिओ'च्या नावाखाली झाली इतकी मोठी फसवणूक..खरेदीपूर्वी हे एकदा बघाच

१४ महिन्यांच्या लेकराला विष पाजलं, नंतर आईने स्वत:ला संपवलं; सोलापूर हादरलं

Womens World Cup : आंबेगावच्या कन्येमुळे भारत झाला महिला क्रिकेट विश्वचषक विजेता; कणर्धार हरमनप्रीतने दिले मायशा शिंदेला श्रेय

SCROLL FOR NEXT