farmers are unhappy about governments wait and watch policy 
नागपूर

पैसेवारी काढताच कशाला?

नीलेश डोये

नागपूर : मागील वर्षाच्या खरीप हंगामात केंद्राच्या निकषाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे कर्जाचे पुनर्गठन करून जमीन महसुलात सूट आणि वीजबिलात सवलत दिली आहे. पैसेवारीच्या आधारे टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पैसेवारी काढताच कशाला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

2019 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांना कमी उत्पादन मिळाले. शासनाकडून काढण्यात आलेल्या पैसेवारीच्या सर्वेक्षणातून याला दुजोरा मिळाला. एकट्या नागपूर विभागातील हजारांवर गावांची पैसेवारी 50 पेक्षा कमी दर्शविण्यात आली. टंचाईग्रस्त गाव जाहीर करताना पैसेवारीचा आधार घेण्यात येतो. तसेच काही सवलतीही देण्यात येते. ठाकरे सरकारने केंद्र सरकारच्या निकषाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले असून महसूल वसुलीत सूट, वीजबिलात 33 टक्के सूट, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 50 पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारने दिली नाही. 

सरकारला कायदे माहीत नसल्याचे दिसते. शेतकऱ्यांना मदतीचा आदेश काढण्यासाठी सहा महिन्यांचा काळ घेतला. पैसेवारीच्या आधारे दुष्काळी ठरलेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याची गरज आहे. पैसेवारीचा आधार घेण्यात येत नसेल तर पद्धतच बंद करून टाकावी. 
-परिणय फुके, आमदार. 

सरकारने कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये सवलती द्याव्या. जुन्याचे पुनर्गठन झाल्यास नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. हा विषय जिल्हा परिषदेच्या सभेत मांडून सरकारकडे पाठपुरावा करू. 
-वंदना बालपांडे,सदस्य जि. प. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT