Farmers Diwali in darkness due to insects 
नागपूर

शेतकऱ्यांनी दिले सोयाबीन पिकाला प्राधान्य; मात्र, अतिवृष्टी व किडीमुळे पीकच गेले हातातून

नीलेश डोये

नागपूर : यंदा सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. अतिवृष्टी आणि किडीमुळे संपूर्ण पीकच हातातून गेले. नागपूर जिल्ह्यात ६८ हजार ९६८ हेक्टरमधील सोयाबीन पीक किडीने फस्त केले.

मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. परंतु, यंदाही त्यांच्या पदरी निराशाच आली. सततच्या पावसाने शेतात पाणी जमा राहिले. यामुळे सोयाबीन किडीचा प्रादुर्भाव झाला. सोयाबीनची पाने पिवळी पडली. काही ठिकाणी सोयाबीनमधील दाणा भरला नसून ते काळे पडले. हाती काही मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी कापणीच टाळली.

शेतातील सोयाबीन न कापता त्यावर थेट ट्रॅक्टर चालवले. काहींनी रोटावेटर मारला. त्यामुळे यंदाही शेतीचा व्यवसाय तोट्याचा ठरला. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात ६८ हजार ९६८.२५ हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड झाली. या संपूर्ण क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यामुळे ९१ हजार ५१३ शेतकरी बाधित झाले असून, ४६ कोटी ८९ लाख ८४ हजार १०० रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाकडून शासनास मदतीसाठी पाठविण्यात आला.

९,७२१ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान

किडीमुळे सोयाबीनसोबत संत्रा आणि मोसंबी या फळपिकांची हाणी झाली. ९७२१.११ हेक्टरमधील फळपिके हातची गेली. यात २६३६.१९ हेक्टर संत्रा तर ७०८५.०१ हेक्टर मोसंबीचा समावेश आहे. १८,१४८ शेतकरी यामुळे बाधित झाले असून, त्यांना मदतीसाठी १७ कोटी ४९ लाख ७९ हजार ९८० रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

SCROLL FOR NEXT