farmers facing problems due lockdown effect on flowers selling in nagpur  
नागपूर

फुलांसाठी शेतात घाम गाळला, पण सर्व फुलांचा कचरा झाला; आमचं नशीबच फुटकं म्हणत शेतकरी ढसाढसा रडला

राजेश रामपूरकर

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घाम गाळून शेतात उत्पादित झालेली फुले फेकून द्यावी लागत असल्याने डोळे पाणावतात.. काय करणार... नशीबच फुटके ...या व्यथा सांगताना फूल उत्पादक शेतकऱ्यांना अश्रू अनावर होत होते. मंदिर, लग्न सोहळे, कार्यक्रमांवर बंदी आहे. बाजारात फुलांची आवक होत असली तरी मागणी कमी थंडावलेली आहे. फुलांना मागणी नसल्याने शेतात फुललेली फुले कोमेजली अन् शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले आहेत. 

शेतात फुलांचे ताटवे फुलले आहे. मात्र, कोरोनाने शेतीतील फुलांचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याने अनेकांनी बाजारात न्यायला परवडत नाही. झाडावर तशीच ठेवली, तर झाड खंगते. तोडाईचे नुकसान झेलून त्यांनी चक्क फुले शेतातच फेकल्याचे हेमंत सावकार या शेतकऱ्यांनी सांगितले. नागपूरच्या मार्केटमध्ये गुलाब, लिली, शेवंती, कलर, डेझी ही फुले मोठ्या प्रमाणात येतात. जिल्ह्यातील फूलउत्पादक शेतकऱ्यांचा यात समावेश अधिक असतो. फुले नाशिवंत असल्याने तोड झाल्याबरोबर तत्काळ विक्रीला आणावी लागतात, अन्यथा मातीमोल होतात. गेल्या आठवड्यात टाळेबंदीमुळे बाजारपेठा बंद होती. त्यामुळे शेतातील माल शेतातच फेकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना बाजारात फुले आणू नका असे निरोप दिले आहेत. तरीही काही शेतकऱ्यांनी बाजारात फुले विक्रीसाठी आणली ते प्रमाण फक्त दहा टक्के आहे. तेवढ्याची फुलांची विक्री होत नसल्याने उलाढालही फक्त १० ते १२ हजार रुपयावर आली आहे, अशी माहिती महात्मा फुले पुष्पउत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी सकाळशी बोलताना दिली. 

फुलाला मागणी नसल्याने विक्रीसाठी आणलेला अर्धापेक्षा अधिक माल फेकून द्यावा लागतो आहे. तोडाईचे पैसेही निघत नसल्याने झाडावरील फुलेही तोडणे बंद केले आहे. विक्री होत नसल्याने फुले फेकून द्यावी लागत आहे, असे निखिल यादव या शेतकऱ्यांनी सांगितले. 

फुलांच्या बाजारातील स्थिती -

  • रोजची आवक : ६० ते ७० गाड्या 
  • उलाढाल : १० ते १२ लाख रुपये 
  • घाऊक फुलांची दुकाने : ९० 
  • आधारित कामगार : ४०० 
  • फूल उत्पादक शेतकरी : १५०० 
  • शहरातील फुलांची दुकाने : ५००० 

मंगळवारची स्थिती -

  • उलाढाल १० ते १२ हजार 
  • आवक - पाच ते सहा गाड्या 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT